मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अशरफ खान पठाण आणि पांगळोली ग्रामस्थ यांचे आंदोलन यशस्वी..!

अशरफ खान पठाण आणि पांगळोली ग्रामस्थ यांचे आंदोलन यशस्वी..!


म्हसळा प्रतिनिधी :- पांगलोली येथील ग्रामपंचायत प्रशासन तथा सरपंच श्री.बिलाल कौचाळी यांच्या मनमर्जी कारभाराला कंटाळून अखेर पंचायत समिती म्हसळा येथे पत्रव्यवहारद्वारे आपल्या हक्क आणि न्यायसाठी दाद मागून देखील केवळ सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकारी तथा प्रशासना विरोधात दि-१८ ऑक्टोबर रोजी म्हसळा तहसील कार्यालय येथे श्री.अशरफ खान पठाण आणि पांगलोली ग्रामस्थ यांच्यावतीने आमरण उपोषण करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला म्हसळा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दर्शवत म्हसळा तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांनी या आंदोलनात उपस्थित राहून सहभाग दर्शवला होता. तसेच आंदोलनाला मिळणारी प्रसिद्धी पाहता,पंचायत समिती म्हसळा चे प्रशासकीय अधिकारी श्री.पोळ साहेब व उपअभियंता बांधकाम राजिप उपविभाग श्रीवर्धन यांनी श्री.अशरफ खान पठाण तसेच ग्रामस्थांच्या मागणी नुसार अवैधरित्या सुरु असलेल्या इमारतीच्या बांधकामाला (व्यायामशाळा) स्थगिती दिली तसेच व्यायामशाळा संदर्भात कोणतेही देयक पारित होऊ नये असे आदेश जिल्हा क्रिडा अधिकारी अलिबाग-रायगड याना देण्यात आले आहे अशी लेखी सूचना गट विकास अधिकारी यांनी दिली आहे. 

गटविकास अधिकारी श्री. पोळ साहेब यांनी चौकशी केली असता जुने ग्रामपंचायत जमीनदोस्त करण्या संदर्भात कोणतीही प्रशासकीय परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही असे लेखी पत्रामध्ये दिसून येते. 

तसेच जुने ग्रामपंचायत कार्यालय जमीनदोस्त करतेवेळी प्रशासकीय मंजुरी न घेता ग्रामपंचायत कार्यालय जमीनदोस्त करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, संदर्भात लेखी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी रा. जि. प यांच्याकडे कार्यवाही करीता सदर करणार असल्याचे लेखी लिहून दिल्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले. तरी या प्रसंगी उपस्थित सर्व राजकीय नेतेमंडळी,सामाजिक कार्यकर्ते,या सर्वांचे आभार व्यक्त केले.तसेच ज्या ज्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला अशा सर्व राजकीय पक्षांचे तसेच प्रशासकीय यंत्रणा ज्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्याकरता सहकार्य केले त्यासर्वांचे देखील आभार व्यक्त केले.

तर हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून सर्व सामान्य नागरिकांचा विजय आहे.! तर पुढील काही दिवसांत जर सदर कामाबाबत कार्यवाही झाली नाही तर भविष्यात पुन्हा आंदोलन छेडला जाईल असा इशारा ही आंदोलन मागे घेते वेळी देण्यात आला. तर म्हसळा तालुक्यातील या यशस्वी आंदोलनामुळे कदाचित आपल्या न्याय आणि हक्क यासाठी सर्व सामान्य नागरिकांसाठी ही एक नवी सुरुवात असू शकते असा विश्वास अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "अशरफ खान पठाण आणि पांगळोली ग्रामस्थ यांचे आंदोलन यशस्वी..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...