
म्हसळा तहसील कार्यालय येथे पांगळोली ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू.!
म्हसळा प्रतिनिधी :- म्हसळा तालुक्यातील पांगलोली येथे सुरू असलेले ग्रामपंचायत हद्दीतील जुने ग्रामपंचायत कार्यालय तोडून उभारण्यात येत असलेल्या व्यायामशाळेच्या बेकायदेशीर कामा संदर्भात गेली अनेक दिवस म्हसळा पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देखील तसेच दि-८ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभा ठरावानुसार सदरचे बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र या ग्रामसभेच्या ठरावाची प्रत मिळत नसल्याने गटविकास अधि. म्हसळा पंचायत यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने ही उदासीनता दाखवत या प्रकरणात जागरूकता दाखवणाऱ्या तसेच लोकशाही मार्गाने पत्र व्यवहार करून विचारणा करणाऱ्या श्री.अशरफ खान पठाण यांना सरपंच तसेच त्यांचे वडील,आणि इतर सहकारी यांनी शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता. केवळ श्री.अशरफ खान पठाण यांना नाहक त्रास व्हावा. या उद्देशाने श्री.शरीफ खान यांनीदेखील तक्रार दाखल केली होती.
या अशा प्रकारे समाज विघातक प्रवृत्ती असणाऱ्या लोकांवर प्रशासकीय अधिकारी तथा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे कारवाई होत नसल्याने सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या हुकूमशाही कारभारविरोधात तसेच म्हसळा प्रशासन यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आज श्री. अशरफ खान पठाण,श्री.सलीम धनसे,अझहर धनसे, जहीर धनसे, नाविद धनसे, जाविद धनसे,उसमा धनसे आणि पांगलोली ग्रामस्थ यांनी म्हसळा तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. तरी सदर प्रकरणी म्हसळा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षियांचा पाठिंबा जाहीर केला असून आजच्या या उपोषणा संदर्भात श्री.सुरेश कुडेकर शिवसेना ता.प्रमुख,
नंदू शिर्के मा.शिवसेना ता.प्रमुख, श्री.प्रकाश रायकर भा. ज. प ता.प्रमुख, श्री.प्रसाद बोर्ले ता.प्रमुख शिवसेना शिंदे गट, श्रीम. नाजिम मुकादम काँग्रेस श.महिला अध्यक्ष म्हसळा, श्री.अश्फाक काठेवाडी काँग्रेस श.अध्यक्ष म्हसळा,श्री.समीर धनसे,श्री.महेश पाटील भा.ज.प म्हसळा तालुका चिटणीस इ.मान्यवरांनी उपस्थिती दाखवत सदर उपसोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे.तरी आता तरी प्रशासनाला जाग येईल का? की अजूनही म्हसळा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी सताधाऱ्यांची हुजरेगिरीच करत राहणार.. असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "म्हसळा तहसील कार्यालय येथे पांगळोली ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू.!"
टिप्पणी पोस्ट करा