मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गोरेगावातील अलहसन इमारतीचा कॉलम कोसळण्याच्या स्थितीत; ३२ कुटुंबांच्या जीवितास धोका?

गोरेगावातील अलहसन इमारतीचा कॉलम कोसळण्याच्या स्थितीत; ३२ कुटुंबांच्या जीवितास धोका?


गोरेगाव | - परवेज टोल, 

गोरेगाव येथील अलहसन इमारतीच्या मुख्य कॉलमचे काँक्रीट पूर्णपणे निखळून पडल्याने आतील स्टीलचे बार वाकलेले (बेंड) असल्याचे सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. या घटनेमुळे इमारतीतील ३२ फ्लॅटमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गोरेगाव ग्रामपंचायत दरवर्षी या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावत असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, ही इमारत २०१२ मध्ये बिल्डर अब्दुला सरखोत यांनी बांधली होती. तसेच इमारतीच्या देखभालीची जबाबदारी फैयाज सरखोत यांच्याकडे असून त्यासाठी दरमहा प्रत्येकी ५०० रुपये देखभाल शुल्क आकारले जात असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.

दरवर्षी धोकादायक इमारतीच्या नोटिसा देऊनही संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई का केली नाही? इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी कोणी केली? आणि या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

रहिवाशांनी प्रशासनाने तातडीने इमारत रिकामी करून संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करावे तसेच जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

0 Response to "गोरेगावातील अलहसन इमारतीचा कॉलम कोसळण्याच्या स्थितीत; ३२ कुटुंबांच्या जीवितास धोका?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...