मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आधी विचारलं का? मग मीटर लावलं कसं? नगराध्यक्षा फरहीन बशारत यांचा महावितरणला सडेतोड सवाल!"

आधी विचारलं का? मग मीटर लावलं कसं? नगराध्यक्षा फरहीन बशारत यांचा महावितरणला सडेतोड सवाल!"


म्हसळा (प्रतिनिधी):एकीकडे राज्यभर स्मार्ट मीटरवरून वादाचा धूर निघत असताना, आता म्हसळा शहरातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षा श्रीम. फरहीन अ. अजीझ बशारत यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "घरमालकाला न विचारता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता रात्रीच्या अंधारात मीटर लावले जातात का?" असा सवाल करत त्यांनी महावितरणला धारेवर धरले आहे.

​नेमका प्रकार काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, म्हसळा शहरात महावितरणमार्फत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, हे मीटर बसवताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला आहे. घरमालक घरी नसताना किंवा त्यांची परवानगी न घेता थेट मीटर बदलले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

​नगराध्यक्षांचे 'लेटरबॉम्ब'....

​नागरिकांच्या रोषाची दखल घेत नगराध्यक्षा फरहीन बशारत यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना लेखी पत्र धाडले आहे. या पत्रात त्यांनी काही रोकठोक प्रश्न उपस्थित केले आहेत:

​पूर्वसूचना का दिली नाही? शहरात मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांना कल्पना का देण्यात आली नाही?

​परवानगीशिवाय घुसखोरी कशी? मालक नसताना मीटर बदलणे हे बेकायदेशीर आहे का? याची स्पष्टता द्या

​पुरावे सादर करा: शासनाचे आदेश आणि परिपत्रके काय आहेत, याची सविस्तर माहिती तत्काळ जनतेसमोर मांडा.

​जनतेमध्ये संतापाची लाट..

​शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केल्याने महावितरण प्रशासनाची धावपळ उडाली आहे. "आधी जनजागृती करा आणि मगच मीटर लावा," अशी भूमिका नगराध्यक्षांनी मांडली आहे. जर महावितरणने आपले धोरण बदलले नाही आणि पारदर्शकता आणली नाही, तर शहरात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​"नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन आम्ही सहन करणार नाही. महावितरणने आपली कार्यपद्धती सुधारावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल."— श्रीम. फरहीन अ. अजीझ बशारत (नगराध्यक्षा, म्हसळा नगर पंचायत)

0 Response to "आधी विचारलं का? मग मीटर लावलं कसं? नगराध्यक्षा फरहीन बशारत यांचा महावितरणला सडेतोड सवाल!""

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...