
पांगलोळी ग्रामपंचायतच्या हुकूमशाही व मनमर्जी कारभार विरोधात तहसिल कार्यालय समोर.दि.१८/१०/२०२२ रोजी अशरफ खान पठाण व पांगलोळी ग्रामस्थ तर्फे आमरण उपोषण.!
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी :- म्हसळा तालुक्यातील पांगलोळी गावात अनेक दिवसांपासून सुरू असलेला सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा मनमर्जी कारभार रायगड जिल्ह्यात सर्वत्र माहीतच आहे,आणि याच विरोधात वाचा फोडण्यासाठी श्री. अशरफ खान पठाण यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पत्रव्यवहार करून पंचायत समिती तसेच अधिकाऱ्यांकडे न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करीत होते.मात्र एक सामान्य नागरिक ला या व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे वागणूक मिळते हे गेल्या काही दिवसांपासून म्हसळा तालुका प्रशासकीय अधिकारी यांच्या वर्तणुकीतून दिसून येते.आणि अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून श्री. अशरफ खान पठाण आणि पांगलोलीं ग्रामस्थ यांच्याकडून दि-१८/१०/२०२२ रोजी कायदेशीर मार्गाने न्याय मिळावा यासाठी म्हसळा तहसील कार्यालय येथे उपोषण करून आंदोलन करण्यात येणार आहे.तरी आता तरी प्रशासन जाग येईल का? की प्रशासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या पुढे आपली हुजरेगिरी करण्यातच धन्यता मानत राहतील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल! की होणारा त्रास हा असाच सुरू राहील ? असा प्रश्न येथील नागरिक विचारीत आहेत.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "पांगलोळी ग्रामपंचायतच्या हुकूमशाही व मनमर्जी कारभार विरोधात तहसिल कार्यालय समोर.दि.१८/१०/२०२२ रोजी अशरफ खान पठाण व पांगलोळी ग्रामस्थ तर्फे आमरण उपोषण.!"
टिप्पणी पोस्ट करा