
म्हसळा तालुका शिवसेनाचा निर्धार मेळावा राजर्षी शाहू सभागृह दादर येथे संपन्न.!
म्हसळा प्रतिनिधी - रविवार दिनांक ९/१०/२०२२ रोजी दादर येथे शिवसेना युवासेना म्हसळा तालुका मुंबई वाशियांचा निर्धार मेळावा शिवसेना म्हसळा तालुका येथील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, भायंदर निवासी निष्ठावंत शिवसैनिकांचा शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीनिष्ठा व्यक करण्या करीता भव्य निर्धार मेळावा माजी केंद्रीय मंत्री.अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाला.
या ठिकाणी आम्ही खंबीरपणे उध्दव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहणार असा निर्धार माजी केंद्रीय मंत्री.अनंत गीते यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी मेळाव्यात व्यक्त केला. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेतील पदाधिकारी आणि मेळाव्यात मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी, महिलांनी हात उंचावून हा निर्धार पक्का केला.
या वेळी शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, श्रीवर्धन मतदार संघ संपर्क प्रमुख सुजीत तांदळेकर, म्हसळा तालुका प्रमुख सुरेश कुडेकर माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, संपर्क प्रमुख म्हसळा गजानन शिंदे, सह संपर्क प्रमुख अनिल काप, समन्वयक दिलीप करंदेकर, तालुका संघटक कृष्णा म्हात्रे, विभाग प्रमुख रमेश जाधव, युवासेना समन्वयक दुर्गेश शिंदे, तालुका अधिकारी अमित म्हामुणकार, कौस्तुभ कर्डे, प्रसन्न निजामपूरकर व आदी पदधिकारी,महिला आघाडी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मेळाव्याचे सूत्रसंचालन संपर्क प्रमुख गजानन शिंदे व अनिल काप यांनी केले तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना विभाग प्रमुख रमेश जाधव यांनी केले. या वेळी नेते गेले परंतु निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेनेसोबत असल्याचे म्हसळा तालुका सहसंपर्क प्रमुख अनिल काप यांनी सांगितले.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "म्हसळा तालुका शिवसेनाचा निर्धार मेळावा राजर्षी शाहू सभागृह दादर येथे संपन्न.!"
टिप्पणी पोस्ट करा