मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर..४ रोजात कारवाई करण्यात यावी अन्यथा म्हसळा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल श्री.अशरफ खान पठाण यांचा इशारा.!

म्हसळा गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर..४ रोजात कारवाई करण्यात यावी अन्यथा म्हसळा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल श्री.अशरफ खान पठाण यांचा इशारा.!


म्हसळा प्रतिनिधी ; 
पांगलोळी ग्रामपंचायत हद्दीतील जुने ग्रामपंचायत कार्यालय तोडून उभारण्यात येत असलेल्या व्यायामशाळे संदर्भात बरेच प्रश्न उद्भवत असताना तसेच सरपंच, ग्रामसेवक यांना आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील कामासंदर्भात काहीच माहिती नाही. तर दि-८ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभा ठराव या मागणी करून देखील मिळत नाही. तरी या संदर्भात श्री.अशरफ खान पठाण यांनी गट विकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

तर याच गोष्टीचा राग मनात ठेवून सरपंच आणि त्यांचे वडील तसेच सहकारी यांनी अशरफ खान पठाण यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. 

मात्र ज्या तक्रारी अर्जामुळे हे सर्व घडले, ती तक्रार दाखल करून आज अनेक दिवस उलटून गेले तरीही गट विकास अधिकारी, गट विस्तार अधिकारी पंचायत समिती कार्यालय म्हसळा यांच्याकडून मात्र त्या अर्जाला रीतसर केराची टोपली दाखवली असे वाटते, कारण एवढं सगळं होऊन सदर कामा बाबत ना चौकशी झाली की ना आम्हाला ठरावाची प्रत मिळाली. असे मत श्री.पठाण यांनी व्यक्त केले

तर एकीकडे ग्रामपंचायत पांगलोळी चे सरपंच श्री.बिलाल अली कौचली हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत आणि वडील श्री.आली कौचालि हे देखील राष्ट्रवादी पक्षाच्या मोठ्या पदावर असल्याने गट विकास अधिकारी आणि गट विस्तार अधिकारी हे सदर कामाबाबत अजून कोणतीही कार्यवाही करीत नाहीत का? किंवा आणखी कोणत्या नेत्यांकडून अधिकाऱ्यांवर दडपण तर नाही ना आणल जात, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

मात्र जर पुढील चार दिवसांत सदर तक्रारी बाबत तसेच कामाबाबत योग्य ती कारवाई करण्यात आली नाही,तर अशा लोकशाहीचा बळी घेणाऱ्या अधिकारी,नेते,लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात  लवकरच म्हसळा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही श्री.अशरफ खान पठाण व ग्रामस्थ यांच्याकडून देण्यात आला आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "म्हसळा गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर..४ रोजात कारवाई करण्यात यावी अन्यथा म्हसळा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल श्री.अशरफ खान पठाण यांचा इशारा.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...