मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रायगड जिल्हा फलाये तंजीम  संस्थेच्या अध्यक्षपदी मुस्तफा पोंजेकर यांची बिनविरोध फेरनिवड.!

रायगड जिल्हा फलाये तंजीम संस्थेच्या अध्यक्षपदी मुस्तफा पोंजेकर यांची बिनविरोध फेरनिवड.!


म्हसळा प्रतिनिधी - 
गेली २७ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगड जिल्हा फलाये तंजीम या संस्थेची त्रिवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत मुस्तफा पोंजेकर यांची सर्वांनुमते अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. यासह पुढील ३ वर्षांकरिता नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली.

रायगड जिल्हा फलाये तंजीमच्या नूतन कार्यकारी मंडळाच्या निवडी बाबत नागोठणे येथील  संस्थेच्या कार्यालयात निवडणूक कार्यक्रम विषयी विशेष सभा पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष म्हणुन मुस्तफा पोंजेकर तसेच अतिक खोत, नाजिम चौगुले, हसन झमाने, इम्तियाज पालकर, इक्बाल नावडेकर यांची उपाध्यक्षपदी तर महासचिवपदी ऍड.इब्राहिम भुसारी, सचिवपदी मोहम्मद अकबर खाजे, नावेद सोंडे, बशीर परबलकर, खजिनदार पदी राशिद फहीम,तर कार्यकारणी सदस्यपदी अली एम शमसी, डॉ. जमाल करूक्कर, मुबशीर जमादार, इरफान शाह, अकील बगदादी, ,इब्राहिम हलडे, फहीम बुबेरे, सगीर पटेल, झेन नाईक, शौकत मुजावर, असीम पालकर, असगर मुल्ला, निसार मोरबेकर, इम्तियाज दर्जी यांची निवड करण्यात आली. निवड निर्णय अधिकारी म्हणुन जाफर येरुणकर यांनी काम केले.

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक डॉ.मुश्ताक मुकादम, निजामुद्दीन जलगावकर, रियाज काझी, मकसूद नजिरी, ईम्तीयाज दर्जी, अकील लंबाते, अब्दुल सलाम फकी, मोहम्मद अली धनसे यांची स्विक्रुत सदस्य म्हणून निवड करण्यांत आली़.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "रायगड जिल्हा फलाये तंजीम संस्थेच्या अध्यक्षपदी मुस्तफा पोंजेकर यांची बिनविरोध फेरनिवड.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...