मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिघी पोर्ट- माणगाव रस्ते विकासक अजून किती बळी घेणार  म्हसळा वासियांचा प्रश्न..! श्री.महादेव पाटील (सर चिटणीस रायगड जिल्हा रा.काँ.पार्टी) यांकडून खा.तटकरे यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी निवेदन.

दिघी पोर्ट- माणगाव रस्ते विकासक अजून किती बळी घेणार म्हसळा वासियांचा प्रश्न..! श्री.महादेव पाटील (सर चिटणीस रायगड जिल्हा रा.काँ.पार्टी) यांकडून खा.तटकरे यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी निवेदन.


म्हसळा प्रतिनिधी : -

दि-५ ऑक्टोबर २०२२ रोजी आज दसरा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना म्हसळा तालुक्यासाठी मात्र आजची सकाळ दुःख देणारी ठरली. म्हसळा तालुक्यातील अपघाती वळण तसेच मृत्यूचा सापळा समजला जाणाऱ्या घोणसे घाटात पुन्हा एकदा एका मालवाहतूक करणाऱ्या गाडीला(ट्रक) ला अपघात झाला.

गाडी क्रं.एम.एच.४३ वाय.७६६४ (वाहांमलक - राधेकांत कुंचम सिंग ठाकूर - गुजरात) ही माल वाहतूक करणारी गाडी सिमेंट विटा घेऊन गुजरात नवसारी इथून श्रीवर्धन कडे येत असताना चांदोरे येथे मुंबई वरून म्हसळा तालुक्यात येणारे प्रवासी अन्य कोणते येण्याचे साधन न मिळाल्याने सदर गाडीतून प्रवास करीत असताना चांदोरे इथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात शेवटच्या वळणावर अपघात झाला. सदर अपघातात प्रवास करीत असणाऱ्या प्रवश्यांपैकी खरसई येथील देवका भुनेसर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, आशिष तांबे (कांदळवाडा), योगेश काप (निगडी) आणि किशोर हेलंडे (पाभरे) वाहनचालक - सदाम इजहार (भेवंडी) हे जखमी असल्याने जखमींना प्राथमिक उपचार प्रा.आ.केंद्र म्हसळा येथे करून पुढील उपचारासाठी पुढील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. तरी सदर अपघात चालकाचा ताबा सुटल्याने की अन्य कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


तर घोणसे घाटाची यापूर्वी अपघाती वळण म्हणून ओळख होती.मात्र घोणसे घाटाला पर्यायी मार्ग व्यवस्था झाल्याने हा घाट रस्ता सोयीस्कर झाला होता.

मात्र सद्या माणगाव- दिघी(पोर्ट) हा नवीन रस्ता होत असताना या रस्त्याचे विकासक असणारी जे.एम.म्हात्रे या कंपनीने आपल्या पद्धतीने काम करताना मात्र काहीस चुकीच्या पद्धतीने काम केल्याने हा घाट पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा बनत आहे. तरी या संदर्भात श्री.महादेव पाटील (मा.सभापती म्हसळा पंचायत समिती तथा सर चिटणीस रायगड जिल्हा रा.काँ.पार्टी) यांनी दि-३ ऑक्टो.२०२२ रोजी मा.खासदार श्री सूनीलजी तटकरे साहेब यांना निवेदन दिले असून लवकरच या वळणावर काही पर्याय निघू शकेल.अशी आशा आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "दिघी पोर्ट- माणगाव रस्ते विकासक अजून किती बळी घेणार म्हसळा वासियांचा प्रश्न..! श्री.महादेव पाटील (सर चिटणीस रायगड जिल्हा रा.काँ.पार्टी) यांकडून खा.तटकरे यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी निवेदन. "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...