
म्हसळा घोणसे घाटात भीषण अपघात; १ मृत ४ जखमी.! घोणसे घाटातील अपघातांची मालिका थांबणार का?
बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी - दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा तालुक्यातील अपघाताचा कर्दनकाळ ठरत असलेल्या घोणसे घाटांत योग्य त्या उपाय योजना दुरुस्त्या शासन आणि म.रा.र.विकास मंडळ करत नसल्याने दिवसेंदिवस घाटात एकाच ठिकाणी अपघाताची मालिकाच सुरू झालेली दिसते.
आज बुधवार दि.५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान MH 43/Y-7664 सीमेंट विटाने भरलेल्या ट्रकचा भिषण अपघात होऊन १ मृत आणि ४ गंभीर झाल्याचं कळतंय, ४० टन क्षमतेचा या ट्रक वाहनाची केबीनचा संरक्षण भिंतीने चक्काचूर केला असून कोणत्या आभ्यासाने संरक्षण भित बांधली हा सद्ध्या चर्चेचा विषय आहे.
ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटून अपघात झाल्याची माहिती मिळतेय यामधे महिला देवका भूनेसर.खरसाई, आतिश तांबे.कांदळ वाडा, किशोर हेलंडे.निगडी हे अपघात ग्रस्त झाले असून महिला ही मयत झाली आहे. तसेच सदर घटनेची माहिती मिळताच स.पो.नी संदीपान सोनावणे यांनी अपघात स्थळी धाव घेतली.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "म्हसळा घोणसे घाटात भीषण अपघात; १ मृत ४ जखमी.! घोणसे घाटातील अपघातांची मालिका थांबणार का?"
टिप्पणी पोस्ट करा