
पत्रकारांच्या दक्षतेमुळे हरवलेली व्यक्ती तत्काळ सापडली; कुटुंबियांनी मानले आभार.!
विशेष प्रतिनिधी - सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात.काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात, असच एक विचार करायला भाग पाडणारा किस्सा सोमवारी घडला एका वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. गंगाराम कृष्णा वागरे असं या व्यक्तीचे नाव वय ८५ राहणार आमशेत ता.म्हसळा जि. रायगड सदर व्यक्ती काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथे स्थित आपल्या मुली कडे गेले असता शुक्रवार दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी रस्ता विसरून सातिवली ता.वसई येथे जंगला मधे भटकत होते, शनिवार दि.०१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता सातिवली गावदेवी पलाटपाडा परिसरात गणेश सोमा भिमरा या देवदूताला भेटले.
सदर व्यक्ती दोन दिवस उपाशी होते त्यांना बोलता येत नव्हते,गणेश भिमरा यांनी त्यांनी चहा नाश्ता दिला राहण्यासाठी आसरा दिला, दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचं नाव व पत्ता सांगितला, स्थानिक नगरसेवकांना कळवून सदर व्यक्तिचा फोटो व त्यांनी सांगितलेला पत्ता व्हॉटसअप वर वायरल केली. फोटो सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरले आणि थेट
म्हसळा पर्यन्त पोहचलं,सदर व्यक्ती आपल्या भागातला आहे हे कळताच पत्रकार अबरार अमीन यांनी म्हसळा शहरातील मित्रांच्या यांच्या मदतीने तात्काळ शोध मोहीम सुरू केली. तब्बल ८ लोकांना संपर्क केल्या नंतर उरण येथील पत्रकार राजा कडू यांनी गणेश भिमरा यांचा नंबर दिला. भिमरा यांच्या कडे संपर्क केला असता त्यांनी सदर व्यक्ती या ठिकाणी सुखरूप असून ते एकदम सुरक्षित आहेत असं सांगितलं.
घरच्या मंडळींचा जीव भांड्यात पडला,त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सदर व्यक्तीला अगदी सुखरूप आपल्या घरी घेऊन आले त्यानंतर त्यांनी अबरार अमीन यांच्याशी संपर्क साधून खूप खूप धन्यवाद मानले. या शोध मोहिमेत पत्रकार राजा कडू त्याचप्रमाणे शेखर सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "पत्रकारांच्या दक्षतेमुळे हरवलेली व्यक्ती तत्काळ सापडली; कुटुंबियांनी मानले आभार.!"
टिप्पणी पोस्ट करा