मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तहसीलदार यांना खरगांव खुर्द ग्रामस्थांचे निवेदन..!

म्हसळा तहसीलदार यांना खरगांव खुर्द ग्रामस्थांचे निवेदन..!


म्हसळा प्रतिनिधी :- दि:२९ सप्टेंबर रोजी नव्याने होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग  ७५३ फ हा खारगांव खुर्द, सकलप गावच्या हद्दीतून जात असल्याने या संदर्भात भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू असताना जे. एम. म्हात्रे या कंपनीने अवैध रित्या कोणत्याही अधिकाऱ्यांची परवानगी न घेता,ब्लास्टिंग केल्याने खारगाव खुर्द, सकलप गावात हादरे बसल्याने काही घरांना तडे गेल्याने,तसेच मोठा हादरा बसल्याने गावकऱ्यांनी या संदर्भात सदर जागी धाव घेत.जे.एम म्हात्रे कंपनीच्या या मनमर्जी कारभारा विरोधात तहसीलदार म्हसळा यांच्याकडे सदर काम थांबविण्यासाठी लेखी निवेदन सादर केले.

तर तहसीलदार श्री. घारे यांनी निवेदनाची दाखल घेत म्हसळा सर्कल यांना या कामासंदर्भात चौकशी चे आदेश दिले.तसेच जो पर्यंत चौकशी अहवाल येत नाही.तो पर्यंत सदर काम थांबविण्यास सांगितले.


यावेळी ग्रामस्थ म्हणून श्री.महादेव पाटील (मा.सभापती),शेखर खोत,पांडुरंग मेंदडकर (मा.सरपंच),काणू लोणशिकर,अरविंद कांबळे,यशवंत मेंदडकर,साईराज कांबळे,तुकाराम खोत,विजय लोनशिकर,योगेश मेंदडकर,अभिजित म्हात्रे इ.उपस्थित होते.

तर एकीकडे ग्रामपंचायत खरगाव खुर्द चे एकही सदस्य लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित न राहिल्याने मात्र ग्रामस्थ नक्कीच लोकप्रतिनिधींना या बाबत काहीच माहीत नाही का? आणि जर माहीत आहे तर लोकप्रतिनिधी म्हणून आपली सामाजिक जाणीव खरचं जिवंत आहे का? अशी खंत ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींजवळ बोलताना व्यक्त केली.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा तहसीलदार यांना खरगांव खुर्द ग्रामस्थांचे निवेदन..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...