मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग ७५३(फ) चे कंत्राटदार जे. एम. एम.आय.पी. एल कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मनमर्जी कारभार..! खरगाव खुर्द, सकलप गावच्या हद्दीत अवैधरीत्या ब्लास्टिंग सुरू..

माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग ७५३(फ) चे कंत्राटदार जे. एम. एम.आय.पी. एल कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मनमर्जी कारभार..! खरगाव खुर्द, सकलप गावच्या हद्दीत अवैधरीत्या ब्लास्टिंग सुरू..


म्हसळा प्रतिनिधी
: माणगाव दिघी दरम्यान काम करत असताना अनेक ठिकाणी जे.एम.म्हात्रे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा मनमर्जी कारभार करत शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं दिसून येतं.तर अनेक ठिकाणी रस्त्यालगत दिशादर्शक फलक तसेच सुद्धा लावले गेले नाहीत.

आणि यावर कळस म्हणजे काय तर दि:२९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या दरम्यान कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता स्वतःच्या मनमर्जी कारभार करत खरगाव खुर्द गावच्या हद्दीत अवैधरीत्या ब्लास्टिंग सुरू केली असता संपूर्ण गावाला हादरे बसले,या संदर्भात गावातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र सदर बाब समजताच ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग ७५३ फ चे काम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली असता.आणि कामासंदर्भात चौकशी केली असता. जे. एम.म्हात्रे कंपनीचे कर्मचारी यांनी उडवा उडविची उत्तरे दिली.तर या संदर्भात कोणाची परवानगी घेतली नसल्याचे  दिसून आले.

‌ तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हा रस्ता जाणार आहे.त्या शेतकऱ्यांना अजून भू संपादन चा मोबदला देखील दिला गेला नाही.मग जे. एम.म्हात्रे.कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा मनमर्जी कारभार कुणाच्या सांगण्यावरून सुरू ठेवला आहे. तर खरगाव चे सरपंच,प्रशासक यांना या संदर्भात काहीच माहिती नाही का? तर अशा प्रकारे ब्लास्टिंग करताना गावात हादरे बसून जर घरं पडणे,घराला भेगा पडणे असे काही प्रकार घडले तर याला जबाबदार कोण असा संभ्रमावस्थेत टाकणारा सवाल निर्माण होत आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग ७५३(फ) चे कंत्राटदार जे. एम. एम.आय.पी. एल कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मनमर्जी कारभार..! खरगाव खुर्द, सकलप गावच्या हद्दीत अवैधरीत्या ब्लास्टिंग सुरू.. "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...