मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माहितीचा अधिकार दिवसाचे औचित्य साधून म्हसळा पोलिस ठाण्यांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न...!

माहितीचा अधिकार दिवसाचे औचित्य साधून म्हसळा पोलिस ठाण्यांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न...!


म्हसळा प्रतिनिधी :-माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अनेक ठिकाणी झालेल्या काम,तसेच इतर शासकीय आदेश यांबाबत योग्य ती माहिती मिळत असल्याने खऱ्या अर्थाने समाजात भ्रष्टाचार रोखण्यासाठी या अधिकाराचा वापर होत असलेला दिसून येतो.तर खऱ्या अर्थाने प्रशासकीय विभागात ही पारदर्शकता आलेली दिसून येते.

मात्र या माहिती अधिकार संदर्भात अनेक गैरसमज निर्माण झालेला दिसून येतो तर अनेकवेळा माहिती अधिकार अंतर्गत माहिती विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होताना दिसून येतो.

मात्र म्हसळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.सोनवणे यांनी प्रभार घेतल्यानंतर लगेचच असा कार्यक्रम घेतल्याने नक्कीच म्हसळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांमध्ये उत्साहाच वातावरण निर्माण झाले आहे.

           सकाळी ११.०० ते १२.००या वेळी कार्यक्रमाकरिता प्रवक्ते आणि मार्गदर्शक म्हणून ॲड.श्री मुकेश पाटील हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये  नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरिता पत्रकार, पोलीस पाटील व प्रतिष्टीथ नागरिक असे ४० ते ५० ग्रामस्थ उपस्थित होते. तर पोलिस कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांमध्ये नक्कीच सलोखा राहील अशी एक आशा निर्माण झाली आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "माहितीचा अधिकार दिवसाचे औचित्य साधून म्हसळा पोलिस ठाण्यांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न...!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...