
तलाठी परीक्षेत उत्तीर्ण करुन नोकरीचे आमिष, सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणारा सरकारी कर्मचारी गजाआड...
महाराष्ट्र,नाशिक : बागलाण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५० लाखांहून अधिक माया जमा करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या तरुणास सटाणा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथून शिताफीने अटक केली. प्रतीक मदन पाठक असे संशयिताचे नाव असून, त्यास सटाणा न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सहा महिने उलटूनही अंतिम यादी न लागल्याने
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेले पालक पंचायत समितीचे माजी सभापती
परशुराम आहिरे यांच्यासह नरेंद्र निंबा भामरे (लखमापूर), संतोष पोपट निकम
(पांढरूण), तुकाराम
पुंडलिक शेवाळे (चौगाव), राजेंद्र
रामचंद्र खैरनार (सातपूर, नाशिक)
यांनी सटाणा पोलिसांत धाव घेऊन प्रतीक मदन पाठकच्या खात्यावर आरटीजीएससह धनादेश व
रोख स्वरूपात नोकरीसाठी ५० लाखांहून अधिक रकम दिल्याचे व त्यातून फसवणूक झाल्याचे
सांगून पाठकविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सटाणा पोलिसांनी फसवणुकीचा
गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्याच्या
प्रतिनिधींच्या मदतीने पाठकचा शोध घेतला असता तो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात
असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सापळा रचून त्यास
अटक केली. त्यास सटाणा न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी
सुनावली. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत, एन. बी. जगताप, वाय. के. शेवाळे, बी. ए. सूर्यवंशी, आर. एम. शिंदे, एस. बी. कदम यांच्या
पथकाने अटकेची कारवाई केली. दरम्यान,
पाठक हा
सटाण्यातील एका राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे.
0 Response to "तलाठी परीक्षेत उत्तीर्ण करुन नोकरीचे आमिष, सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणारा सरकारी कर्मचारी गजाआड... "
टिप्पणी पोस्ट करा