मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अझहर धनसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या म्हसळा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती...

अझहर धनसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या म्हसळा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती...


म्हसळा प्रतिनिधी - फहद पेणकार :- म्हसळा तालुका कार्याध्यक्ष म्हणून खूप मोलाचे योगदान दिल्याने दिनांक - १७ फेब्रुवारी रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार श्री.अझहर धनसे यांची म्हसळा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने म्हसळा तालुक्यात सर्वच स्तरांतून धनसे यांना शुभेच्छा देण्यात येत असून म्हसळा तालुक्यात राजकीय क्षेत्रात नक्कीच भविष्यात बदल घडेल असे मत अनेक राजकीय विश्लेषकानी व्यक्त केले आहे. तरी याबाबत धनसे यांनी आमच्या प्रतिनिधींशी पुढील वाटचाली बाबत बोलताना नक्कीच म्हसळा तालुक्यात राजकीय बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला. ज्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना जनता माफ करणार नाही. आणि याचीच पोच पावती काल मिळाली, एकेकाळी खासदारांच्या येण्याने म्हसळा शहरात गर्दी व्हायची . काळ मात्र स्वतः उप मुख्यमंत्री म्हसळा शहरात आले असताना देखील म्हसळा तालुक्यातील आणि शहरातील मुस्लिम बांधव तसेच इतर समाजाने देखील काल झालेल्या रॅली च्या कार्यक्रमात पाठ फिरवली. तर काल झालेल्या कार्यक्रमात तहसिल कार्यालय इमारत लवकरच नव्याने बांधण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली असता, यावर धनसे यांनी आधी झालेल्या इमारतींमध्ये कर्मचारी पदे भरण्यात यावी. कर्मचारी नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. इमारती बांधल्या म्हणजे विकास होत नसतो त्यामध्ये कर्मचारी असणे देखील महत्वाचे आहे अशी टीका धनसे यांनी केली. तसेच पुन्हा एकदा कालच्या कार्यक्रमामुळे नागरिकांनी पोच पावती दिली असून येणाऱ्या काळात निश्चितच जनता बदल घडवेल असे मत धनसे यांनी आमच्या प्रतिनिधींजवळ व्यक्त केले.



0 Response to "अझहर धनसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या म्हसळा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...