मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा पाणी पुरवठा विभाग करणार का ठेकेदारावर गुन्हा दाखल.?  संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा  ``तहसीलदार समीर घारे"

म्हसळा पाणी पुरवठा विभाग करणार का ठेकेदारावर गुन्हा दाखल.? संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा ``तहसीलदार समीर घारे"


विशेष प्रतिनिधी : म्हसळा :  म्हसळा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून ठेकेदारांचा प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता मनमर्जी कारभार सुरू असल्याचे दिसून येते. असाच काहीसा प्रकार संदेरी येथे सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,

     संदेरी येथील धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर संदेरी येथील धरणा शेजारी विहीर खोदण्याचे काम सुरू होते. मात्र संदेरी येथील धरणाशेजारी विहीर खोदत असताना ठेकेदार श्री.मजहर देशमुख आणि अवैध रित्या नेमण्यात आलेले उप ठेकेदार यांनी दोघांनी संगनमताने धरण शेजारील प्रतिबंधित असणाऱ्या क्षेत्रात अनधिकृत रित्या विस्फोट घडवून आणले. तसेच या प्रकरणी संदेरी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी ही बाब सदरील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तसेच म्हसळा तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली अनेक वेळा पत्र व्यवहार केले मात्र तरी देखील शासकीय अधिकारी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. अखेर जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्याकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी या प्रकरणी तहसीलदार श्री.समीर घारे, म्हसळा यांनी उप अभियंता ग्रामीण पाणीपुरठा यांच्याकडे पत्रव्यवहार करत या प्रकरणी ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश दिले असून पाणीपुरवठा विभाग सदरचे ठेकेदार मजहर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारीत आहेत.

0 Response to "म्हसळा पाणी पुरवठा विभाग करणार का ठेकेदारावर गुन्हा दाखल.? संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा ``तहसीलदार समीर घारे""

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...