
प्लास्टिक मिश्रित नव्हे तर फोर्टिफाईड तांदूळ....
बुधवार, २० सप्टेंबर, २०२३
Comment
उप-संपादक : आसिफ खान :- काही दिवसांपूर्वी कोंकण २४ न्यूज च्या माध्यमातून वांजळे येथे प्लास्टिक तांदूळ मिळाल्याप्रकरणी बातमी प्रकाशित करण्यात आली होती, तरी या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तालुका पुरवठा अधिकारी यांच्या म्हणण्याप्रमाणे सदरचे तांदूळ प्लास्टिक मिश्रित नसून नव्या पद्धतीचे फोर्टिफाईड तांदूळ असून यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पोषक घटक आहेत.माणसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र सदरचे तांदूळ रेशन च्या माध्यमातून देण्याआधी शासनाकडून नागरिकांना याबाबत जनजागृती का करण्यात आली नाही. तसेच श्री.गायकर यांनी रेशन दुकान धारकांना याबाबत माहिती विचारली असता त्यांना देखील याबाबत ठोस माहिती का सांगता येत नाही. मुळात शासनाकडून फोर्टिफाईड तांदळाबाबत जनजागृती करणे महत्वाचे होते, तरी याबाबत श्रीवर्धन तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडून जनजागृती का करण्यात आली नाही असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण होत असलेले दिसून येते. सध्या बाजारात अनेक भेसळ आणि मिश्रित अन्नधान्य मिळत असताना शासनकडून अशा पद्धतीचे तांदूळ वाटप झाल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Response to "प्लास्टिक मिश्रित नव्हे तर फोर्टिफाईड तांदूळ...."
टिप्पणी पोस्ट करा