
उरण तालुक्यात कारंजा टर्मिनल & लॉजिस्टिक्स प्रा. लि. या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा वाहतूक...
शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३
Comment
उरण विशेष प्रतिनिधी :- गेल्या काही वर्षांपासून मत्स्य व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट होत असतानाच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बांधवांना आज ही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते असल्याचे दिसून येथे.त्यातच उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय होत असतानाच आता उरणमधील कारंजा येथे करंजा टर्मिनल & लॉजिस्टिक्स प्रा. लि या कंपनीकडून उरण येथील खाडीमधून मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाची वाहतूक होत असल्याने या क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बांधवांना अनेक समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येथे.ज्यामध्ये मासळीसाठी लावलेले जाळे फाटल्याने माच्छिमार बांधवांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.तसेच या वाहतुकीमुळे खडीलगत मिळणारी मासळी मधील शेवंडा,खेकडा, निवटे या माश्यांच्या जाती नष्ट होत असल्याचे दिसून येते.
तसेच सदरच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम सुरू असल्याचे देखील दिसून येते. तरी सदर कंपनीकडून गाळ उपसा संदर्भात परवानगी घेण्यात आली आहे का? तसेच खाडीलगत असणारी खारफुटी च्या झाडांची मोठ्या प्रमाणत तोड करण्यात आली असल्याने याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी या संदर्भात उरण मधील सामजिक कार्यकर्ते श्री.सचिन डाऊर यांनी अर्जाद्वारे मागणी केली आहे.
उरण विशेष प्रतिनिधी :- गेल्या काही वर्षांपासून मत्स्य व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट होत असतानाच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बांधवांना आज ही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते असल्याचे दिसून येथे.त्यातच उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय होत असतानाच आता उरणमधील कारंजा येथे करंजा टर्मिनल & लॉजिस्टिक्स प्रा. लि या कंपनीकडून उरण येथील खाडीमधून मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाची वाहतूक होत असल्याने या क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बांधवांना अनेक समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येथे.ज्यामध्ये मासळीसाठी लावलेले जाळे फाटल्याने माच्छिमार बांधवांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.तसेच या वाहतुकीमुळे खडीलगत मिळणारी मासळी मधील शेवंडा,खेकडा, निवटे या माश्यांच्या जाती नष्ट होत असल्याचे दिसून येते.
0 Response to "उरण तालुक्यात कारंजा टर्मिनल & लॉजिस्टिक्स प्रा. लि. या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा वाहतूक..."
टिप्पणी पोस्ट करा