मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीवर्धन तालुक्यात रेशन वर मिळाले प्लास्टिक तांदूळ...

श्रीवर्धन तालुक्यात रेशन वर मिळाले प्लास्टिक तांदूळ...


श्रीवर्धन विशेष प्रतिनिधी
:-  देशात वाढत्या महागाईत रेशनिंग वर मिळणारे धाण्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे प्लास्टिक मिश्रित अनेक प्रकारचे धान्य ही सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर रेशन वर मिळणाऱ्या धान्यात ही अशा प्रकारच्या प्लास्टिक युक्त धान्याची भेसळ होत असल्याची माहिती श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथील नागरिकांनी आमचे प्रतिनिधी आसिफ खान यांचेशी बोलताना दिली.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की, वांजले येथील श्री.बाळकृष्ण गायकर हे ४-५ दिवसांपूर्वी वांजले येथीलच एका घरात वॉशिंग मशीन च काम करण्यासाठी गेले असता तिथे एक महिला रेशन वरून मिळणारे तांदूळ साफ करीत असताना श्री.गायकर यांनी विचारलं असता खराब तांदूळ साफ करीत असल्याचे सांगितले मात्र मनात शंका आल्याने गायकर यांनी काही तांदूळ हिटर चे साहाय्याने गरम केले असता तांदूळ प्लास्टिक सारखे ताणत गेले आणि वितळले असल्याचे दिसून आले. तरी याबाबत त्यांनी वांजले येथील रेशन दुकानदार श्री.रेलेकर यांना याबाबत माहिती दिली असता सगळीकडे असच सुरू असल्याचे दुकानदार यांनी सांगितले. तरी जर हे प्लास्टिक मिश्रित तांदूळ असतील तर लोकांच्या आरोग्यावर याचा खूप भयंकर परिणाम होऊ शकतो अशी शंका गायकर यांनी आमच्या प्रतिनिधींजवळ बोलताना व्यक्त केली.

0 Response to "श्रीवर्धन तालुक्यात रेशन वर मिळाले प्लास्टिक तांदूळ..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...