मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उरण गटविकास अधिकारी कार्यालयात मंगळागौरी नाच;अधिकारी वर्गाचा वचक नसल्याचे दिसते.

उरण गटविकास अधिकारी कार्यालयात मंगळागौरी नाच;अधिकारी वर्गाचा वचक नसल्याचे दिसते.


उरण(विशेष प्रतिनिधी) : उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात काल ते बाहेर असल्याचा फायदा महिला कर्मचाऱ्यांनी उचलत शासकीय कामाच्या वेळेत मंगळागौरी नाच केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे शासकीय कार्यालये ही नाच गाजण्याची ठिकाणे बनू लागल्याची चर्चा जिल्हयात सुरू आहे. जनतेच्या समस्यांचा बोजवारा वाजत असताना हे मात्र मौजमजा करण्यात मग्न आहेत. याबाबत शासकीय यंत्रणा काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी असाच व्हिडिओ पनवेल पंचायत समिती कार्यालच्या परिसरात घडला होता, त्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावरून शासकीय कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव नसल्यामुळेच बेशिस्तपणा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

      जिल्ह्यातील पंचायत समितीचे कार्यालय हे आता जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याऐवजी तेथील कर्मचाऱ्यांचे मौजमजा करण्याचा अड्डा बनू लागले आहे. जिल्ह्यातील काही पंचायत समितीमधील कर्मचारी कार्यालयातच दारू व मटणाच्या पार्टी झोडीत असतात. काही महिन्यांपूर्वी पनवेल पंचायत समितीमधील ग्रामसेवक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना कार्यालयीन वेळेतच पनवेल पंचायत समितीच्या आवारातच ब्रास बँडवर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. याची तक्रार गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे करूनही त्यांनी कोणतीच कारवाई केल्याचे दिसत नाही.

    सध्या श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे सणांचा हंगाम सुरू आहे. मंगळागौरीचे कार्यक्रम सुरू आहेत. उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकर हे काल मंगळवार दि. २९ ऑगस्ट रोजी  दिव्यांगाचा कार्यक्रम असल्याने ते उरण बाहेर होते. याचा फायदा उठवत कार्यालयातील महिलां कर्मचाऱ्यांनी उचलत थेट गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाचा ताबा घेत कोणतीही परवानगी न घेता मंगळागौरीचे नाचगाणी सुरू केल्याचा व्हिडीओ आज सकाळपासून व्हायरल झाला आहे. यामुळे जिल्हाभर उरण पंचायत समिती हे जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याऐवजी अधिकारी व कर्मचारी वर्ग आपली मौजमजा करण्यात मग्न असल्याचा चर्चेचा विषय बनला आहे. 
      यापूर्वी ही वरिष्ठ अधिकारी यांची कार्यालयात उपस्थिती नसताना कर्मचारी मनमानी व आवोजाओ घर तुम्हांरा असे कधीपण येतात व कधीपण जात आहेत. तरी शासनाने बायोमेट्रिक थम मशीन बसविण्याचे आदेश दिले आहेत, त्याची नितांत गरज ही उरणमधील सर्वच शासकीय कार्यालयांना आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष घालून अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा येरे माझ्या मागल्या, कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणण्याची वेळ उरणच्या जनतेवर न येवो अशी मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे.

0 Response to "उरण गटविकास अधिकारी कार्यालयात मंगळागौरी नाच;अधिकारी वर्गाचा वचक नसल्याचे दिसते."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...