मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पांगळोली गावचे सामाजिक कार्यकर्ते, कोंकण फास्ट न्युज, कोंकण २४ न्युज चे संपादक अझहर धनसे यांची १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुटका...!  देशाच्या स्वातंत्र्य दिनी भ्रष्टाचार आणि अन्यायविरोधी लढणाऱ्या पत्रकाराची सुटका हा योगायोग समजावा का..? म्हसल्यात चर्चेला उधाण...

पांगळोली गावचे सामाजिक कार्यकर्ते, कोंकण फास्ट न्युज, कोंकण २४ न्युज चे संपादक अझहर धनसे यांची १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुटका...! देशाच्या स्वातंत्र्य दिनी भ्रष्टाचार आणि अन्यायविरोधी लढणाऱ्या पत्रकाराची सुटका हा योगायोग समजावा का..? म्हसल्यात चर्चेला उधाण...


उप-संपादक : १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. अखेर गुलामगिरीतून देशाची मुक्तता झाली. मात्र आज ही देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात असल्याचे चित्र दिसून येते. असाच काहीसा प्रकार म्हसळा तालुक्यात घडला असल्याचे दिसून येथे. गेल्या २ वर्षांपासून म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायत कार्यालयात मनमर्जी कारभार सुरू असल्याचे दिसून येत असताना यात भ्रष्टाचार झाला असलेबाबत पांगळोली येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांनी आंदोलन करीत हे प्रकरण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. आणि कोकण आयुक्त कोंकण भवन यांनी देखील या प्रकरणी भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध होत असल्याने संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले मात्र संबंधितांवर कारवाई न करता याउलट म्हसळा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पांगळोली ग्रामपंचायत हद्दीत ग्रामसेवक केसकर आणि प्रशासक यांच्या माध्यमातून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आणि यावेळी ग्रामसेवक केसकर अजून पांगळोली ग्रामपंचायतीचा कारभार कासे काय सांभाळत आहेत? याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आणि याचवेळी हे भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला याबाबत राग मनात ठेऊन ग्रामसेवक केसकर यांनी  श्री.अझहर धनसे यांना आणि त्यांचा भाऊ मुजाहिद धनसे या दोघांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देऊन दोघानाही पोलिसांमार्फत अटक करण्यात आली होती. आणि जवळ जवळ २० दिवसानंतर अखेर आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनी श्री.अझहर धनसे आणि त्यांचा भाऊ मुजाहिद धनसे यांना  जामिनावर सुटका करण्यात आली. तरी याबाबत १५ ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्यदिनी च भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि कोकण फास्ट न्युज,कोकण २४ न्युज चॅनलचे संपादक श्री.अझहर धनसे यांची सुटका झाल्याने पांगळोली गावच्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर विरोधकांच्या मात्र भुवया उंचावल्या गेल्या असल्याचे चित्र दिसून येते. तर हा योगायोग समजावा का? अशी चर्चा देखील म्हसळा तालुक्यात सुरू असल्याचे दिसून येते.  

0 Response to "पांगळोली गावचे सामाजिक कार्यकर्ते, कोंकण फास्ट न्युज, कोंकण २४ न्युज चे संपादक अझहर धनसे यांची १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुटका...! देशाच्या स्वातंत्र्य दिनी भ्रष्टाचार आणि अन्यायविरोधी लढणाऱ्या पत्रकाराची सुटका हा योगायोग समजावा का..? म्हसल्यात चर्चेला उधाण..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...