
कारिवणे ग्रामपंचायतच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनेसाठी कचरा कुंड्यांचे वाटप.!
रविवार, १ जानेवारी, २०२३
Comment
श्रीवर्धन प्रतिनिधी- संदीप लाड :- श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायत कारीवणे येथे घनकचरा व्यवस्थापन योग्य रीतीने व्हावे या करिता प्रत्येक कुटुंबास कचरा कुंड्याचे वाटप करण्यात आले.सदरील कचरा कुंड्या ग्रामपंचायत कारीवणे १५ वा वित्त आयोगाच्या निधी मधून वाटप करण्यात आल्या आहेत.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी याकरिता ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. नुकतेच ग्रामपंचायत कारीवणे ची हर घर जल व ओ.डी. एफ.प्लस म्हणून घोषणा झाली आहे.
कचरा कुंड्याचे वाटप करत असताना ग्रामपंचयात च्या वतीने घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन प्रभावी होण्याच्या दृष्टीने माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास माजी सभापती बाबुराव चोरगे ,गीता चोरगे, सरपंच,बबन जोशी उपसरपंच, अनंता चोरगे,सदस्य लक्ष्मण भुवड,वंदना म्हसकर,लक्ष्मी चोरगे,ग्रामसेवक अभिजित माने ,किसन चोरगे,तुकाराम म्हसकर,गणेश भुवड, बाळकृष्ण म्हसकर,अनंत बर्जे, सखाराम चोरगे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Response to "कारिवणे ग्रामपंचायतच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनेसाठी कचरा कुंड्यांचे वाटप.!"
टिप्पणी पोस्ट करा