
मिथुन चीचघरकर आणि वसीम मुकादम यांच्यावर नेमका वरदहस्त कुनाचा? का होत नाही अवैध वाळू धंद्यावर कारवाई...
दापोली प्रतिनिधी : मुझममिल जैतापकर - दापोली तालुक्यातील केळशी येथील अवैध वाळू उपसा याबाबत जनतेतून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला होता . याची दखल घेत दापोली महसूल विभागाने २ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातील काही व्यक्ती आजही बिनधास्त पने फिरत आहेत. प्रशासन आमचं काही वाकड नाही करू शकत तसेच आम्ही प्रशासनाला कोणत्याच घाबरत नाही सांगून चक्क प्रशासनाला आव्हान करीत असल्याचे दिसून येते.
वाळू उपसा प्रकरणातील केलशी परिसरातील एका गाव प्रतिनिधीचा मुलगा आणि वीट भट्टी मध्ये गुंतून असलेला यांनी याच वाळू प्रकरणातील जवळ जवळ २०० ब्रास वाळू अवैध रीतीने मंदिवली परिसरात विक्री केली असल्याचे दिसून येते. मात्र या दोघांविरोधात प्रशासन एवढ शांत का ? असा सवाल असा प्रश्न दापोली तालुक्यातून व्यक्त केला जात आहे
तसेच या दोन्ही व्याक्ती विरोधात प्रशासन काही कारवाई करणार आहे कि नाही कि प्रशासनातील काही व्यक्ती आपल्या वयक्तिक स्वार्थासाठी या व्यक्तींना पाठीशी घालत असल्याची चर्चा हि सध्या दापोली तालुक्यात रंगली असल्याचे दिसून येते. तर एकीकडे या दोन्ही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोली तालुक्यातील पर्यावरण प्रेमी कडून होत आहे यातील एकाची आई गाव प्रथम नागरिक म्हणून ओळखली जाते म्हणजे तिचा दबदबा असल्याने आणि गोरगरीब लोक तक्रार करण्यास घाबरत आहेत गेले अनेक वर्ष संबंधित आपला पदाचा गैरवापर करून मुलाला रान मोकळे करून दिले असल्याचेही बोलले जात आहे या बाबा रत्नागिरी जिल्हाधिकारी खनिज कर्म अधिकारी दापोली तालुक्याचे लोकप्रिय प्रांत अधिकारी तहसीलदार अंडर अधिकारी तलाठी यांनी लक्ष देऊन त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
0 Response to "मिथुन चीचघरकर आणि वसीम मुकादम यांच्यावर नेमका वरदहस्त कुनाचा? का होत नाही अवैध वाळू धंद्यावर कारवाई..."
टिप्पणी पोस्ट करा