मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे मोठ्या प्रमाणात मटका आणि जुगार सुरु.पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष..!

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे मोठ्या प्रमाणात मटका आणि जुगार सुरु.पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष..!


श्रीवर्धन प्रतिनिधी :- गेल्या अनेक दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे मोठ्या प्रमाणात मटका आणि जुगार सुरु असल्याचे दिसून येते.याबाबत सविस्तर वृत्त असे कि श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे पर्यटन स्थळ असल्याने त्या शेजारी असणारे शहर म्हणून बोर्ली शहराला मोठे महत्व प्राप्त झाले असून तसेच बोर्ली हे शहर असल्याने तसेच बाजार पेठ असल्याने या शहरात नेहमीच अनेक नागरिकांचीवर्दळ असलेली दिसून येते.मात्र या शहराला काही दिवसांपासून मटका आणि जुगार खेळाच्या राक्षसाचे ग्रहण लागलेले दिसून येते.तर एकीकडे या मटका आणि जुगार अड्डे यांबाबत पोलीस प्रशासनाला काहीच माहित नाही कि माहिती असुन देखील पोलीस प्रशासन काहीच माहित नसल्याचे सोंग घेत याबाबत अनेक जणांच्या मनात शंका उपस्थित होताना दिसत आहे.तर एकीकडे पोलीस प्रशासन या खेळांवर कायदेशीर कारवाई करणार का ? असा प्रश्न देखील विचारला जात असलेले पाहायला मिळते.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे मोठ्या प्रमाणात मटका आणि जुगार सुरु.पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...