
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सरपंच पदाचा गैरवापर.. दोषी असणाऱ्या सरपंच सुपुत्रावर दापोली महसूल प्रशासन कारवाई करणार का ?
रविवार, २५ डिसेंबर, २०२२
Comment
दापोली प्रतिनिधी :- दापोली तालुक्यातील केळशी कवडवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये सरपंचांच्या मुलाची दादागिरी पहावयाला मिळाली आहे.ज्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त भूमिका घेत असलेले दिसून येतात.याच कारण कि गेल्या काही दिवसांपूर्वी कवडवली ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचली असल्याने खाडीतील गाळ काढण्यात आली,मात्र याचवेळी खाडीतील गाळ काढण्याच्या निमित्ताने वाळू काढण्यात आली.आणि या या काढलेल्या वाळूची विक्री करते वेळी या प्रकरणात केळशी कवडवली चे सरपंचांचे सुपुत्र श्री.मिथून चीचघरकर यांनी हस्तक्षेप करीत माझी आई सरपंच असल्याने मला हि वाळू फुकट द्या नाहीतर मी तुमच्या विरोधात तक्रार करेन तसेच तुरुंगात पाठविण्याची धमकी मिथुन यांनी वाळू उपसा तथा विक्री करणाऱ्यांच्या टोळक्याला दिली,त्यामुळे या टोळक्यांनी या वेळी समेट करत हि अट मान्य केली. मात्र काही दिवसांनी वाळू उपसा करणाऱ्या तरुणांनी वाळू काढलीच नाही . ज्यामुळे मिथुन यांच्या वाळू विक्रीच्या धंद्यात नुकसान होऊ लागले, आणि याचा राग मनात धरून मुलाच्या सांगण्यावरून कवडवली ग्रामपंचायत च्या सरपंच यांनी खाडीतील वाळू उपसा केलेप्रकरणी दापोली तालुका महसूल विभागाकडे तक्रार केली तर सदर तक्रारीवर कार्यवाही करत वाळू उपसा करणाऱ्या तरुणांवर तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी या वाळूची विक्री केली असे श्री.मिथुन चीचघरकर आणि श्री.वसिम मुकादम यांनी प्रत्येकी जवळ जवळ १०० ब्रास वाळू ची विक्री केली असल्याचे चित्र दिसून येते, तर या वाळू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर देखील प्रशासन अशाच पद्धतीने तत्काळ कारवाई करणार का ? असा प्रश्न केळशी परिसरातील नागरीक तथा कवडवली ग्रामस्थ विचारताना दिसत आहेत.
दापोली प्रतिनिधी :- दापोली तालुक्यातील केळशी कवडवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये सरपंचांच्या मुलाची दादागिरी पहावयाला मिळाली आहे.ज्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त भूमिका घेत असलेले दिसून येतात.याच कारण कि गेल्या काही दिवसांपूर्वी कवडवली ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचली असल्याने खाडीतील गाळ काढण्यात आली,मात्र याचवेळी खाडीतील गाळ काढण्याच्या निमित्ताने वाळू काढण्यात आली.आणि या या काढलेल्या वाळूची विक्री करते वेळी या प्रकरणात केळशी कवडवली चे सरपंचांचे सुपुत्र श्री.मिथून चीचघरकर यांनी हस्तक्षेप करीत माझी आई सरपंच असल्याने मला हि वाळू फुकट द्या नाहीतर मी तुमच्या विरोधात तक्रार करेन तसेच तुरुंगात पाठविण्याची धमकी मिथुन यांनी वाळू उपसा तथा विक्री करणाऱ्यांच्या टोळक्याला दिली,त्यामुळे या टोळक्यांनी या वेळी समेट करत हि अट मान्य केली. मात्र काही दिवसांनी वाळू उपसा करणाऱ्या तरुणांनी वाळू काढलीच नाही . ज्यामुळे मिथुन यांच्या वाळू विक्रीच्या धंद्यात नुकसान होऊ लागले, आणि याचा राग मनात धरून मुलाच्या सांगण्यावरून कवडवली ग्रामपंचायत च्या सरपंच यांनी खाडीतील वाळू उपसा केलेप्रकरणी दापोली तालुका महसूल विभागाकडे तक्रार केली तर सदर तक्रारीवर कार्यवाही करत वाळू उपसा करणाऱ्या तरुणांवर तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला.
0 Response to "रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सरपंच पदाचा गैरवापर.. दोषी असणाऱ्या सरपंच सुपुत्रावर दापोली महसूल प्रशासन कारवाई करणार का ?"
टिप्पणी पोस्ट करा