
म्हसल्यात डिजिटल इंडिया चा भोंगळ कारभार. ग्रामपंचायत नाम निर्देशन फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना करावा लागतोय अडचंणीचा सामना.!
गुरुवार, १ डिसेंबर, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी : - म्हसळा तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींची मुदत संपल्याने ग्राम पंचायत निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.जाहीर झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये यावेळी कोण बाजी मारणार या बाबत म्हसला तालुक्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत.कारण राष्ट्रवादी पक्षाचे खास.श्री.सुनील जी तटकरे तसेच आमदार आणि मा.पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या श्रीवर्धन मतदार संघात शिंदे गटाचा वाढता प्रभाव तसेच म्हसला तालुक्यातील पांगळोली येथील सरपंच श्री.बिलाल आली कौचाली यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप त्याच बरोबर म्हसला तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षातून शिंदे गटात होणारा कार्य कर्त्यांचा पक्ष प्रवेश या सर्व राजकीय घडामोडी पाहता ही निवडणूक नक्कीच रंगतदार होणार आहे,या बद्दल शंकाच नाही.
तर या वेळी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपला निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी तहसील कार्यालय तथा नामनिर्देशन कक्षात फॉर्म भरण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येते.मात्र इंटरनेट ची समस्या असल्याने फॉर्म भरण्याची वेबसाइट स्लो असल्याचे दिसून येते. तर एकीकडे नाम निर्देशन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख जवळ आल्याने अनेक इच्छुक उमेदवार आपले नाम निर्देशन फॉर्म भरण्यासाठी गडबड करीत असल्याचे दिसून येते.
मात्र यावरून एक गेली अनेक वर्ष डिजिटल इंडिया चा ढोल पिटणारे सत्ताधारी पक्षाचा डिजिटल इंडिया चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असल्याचे दिसून येते.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "म्हसल्यात डिजिटल इंडिया चा भोंगळ कारभार. ग्रामपंचायत नाम निर्देशन फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना करावा लागतोय अडचंणीचा सामना.!"
टिप्पणी पोस्ट करा