
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या सतर्कते मुळे विझवला वेश्वी जंगलातील वणवा आणि वाचवलं बांबुंच वन.
रविवार, ४ डिसेंबर, २०२२
Comment
उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे )दिनांक 2/12/2022 रोजी उरण तालुक्यातील वेश्र्वी गावातील एकवीरा डोंगर माथ्यावर वाईट प्रवृत्तीच्या कुण्या अज्ञाताने डोंगराला आग ( वणवा )लावला.आणि ह्याच डोंगर माथ्यावर काही वर्षा पूर्वी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या वतीने जवळ जवळ 500( पाचशे )बांबूची लागवड केलेल्या बांबू वनाला आग लागली. आगीच रौद्ररूप पाहता त्या हिरव्यागार बांबूची जळून राख - रांगोळी होतो की काय असं वाटत असतानाच ही गोष्ट केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या निदर्शनास येताच लगेचच त्यांनी आपल्या टीमला कळवले लागलीच कॉन संस्थेच्या सदस्यांनी तिथे धाव घेऊन मागचा पुढचा विचार न करता तो जंगलाला लागलेला वणवा विझवायला सुरवात केली !आपल्या जीवाची पर्वा न करता आज पर्यंत जंगलातील अनेक वणवे विझवणारे संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि त्यांच्या टीमने आज पुन्हा एकदा निसर्गाचं रक्षण केलं त्याच बरोबर त्या आगीच्या भक्षस्थानी येणाऱ्या लाखो जीव - जंतुंचे जीव देखील वाचविले ! या आगीची भयानकता एवढी होती की आग ( वणवा ) विझविताना त्यांची पूर्ण दमछाक झाली असतानां त्यांनी दोन आदिवासी बांधवांना देखील कॉल करून बोलावले एवढचं नाही तर राजू मुंबईकर यांनी त्या युवकांना आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे देऊन ही जंगलात लागलेली आग ( वणवा )विझावयाला मदत करण्यास सांगितले.
आज मानवा कडून निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास आणि आज काल निसर्गाचं बदलेल रौद्र रूप पाहता आपण विनाशाच्या खाईत ओढले जात आहोत.आणि खऱ्या अर्थाने जर निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करायचं असेल तर आज समाजात केअर ऑफ नेचर सामजिक संस्था या सारख्या पर्यावरण प्रेमी संस्थांची आणि अश्या निसर्गप्रेमींची, वन्यजीव प्रेमिंची काळाची गरज असल्याचे मत निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
0 Response to "केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या सतर्कते मुळे विझवला वेश्वी जंगलातील वणवा आणि वाचवलं बांबुंच वन."
टिप्पणी पोस्ट करा