मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उलवे नोड वासियांना मिळणार १७ वर्षानंतर हक्काची स्मशानभूमी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याला यश.!

उलवे नोड वासियांना मिळणार १७ वर्षानंतर हक्काची स्मशानभूमी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याला यश.!


उरण (विठ्ठल ममताबादे) उलवे नोड ची स्थापना होउन गेल्या १७ ते १८ वर्षात दोन लाखाहुन अधिक लोक रहायला आले परंतू कुणाचा मृत्यु झाल्यास  अंत्यविधीसाठी उलवे नोडसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे, प्रकल्पग्रस्त  गावकऱ्यांना  विनंती करावी लागत असे, त्यातील अनेक गावांनी नोडलमधील मयत त्यांच्या स्मशानात जाळण्यासाठी मज्जाव केल्यामुळे, मयत घेऊन नातेवाईकांना सि.बी.डी. बेलापूर, खारघर, वाशी येथे अंत्यविधीसाठी जावे लागत असे. उलवे नोड मधील अनेक नागरिकांच्या फोरमने, सिडकोबरोबर संघर्ष करून प्रकल्पग्रस्त गावासाठी, खेळाची मैदाने, स्मशानभूमी कम्युनिटी हॉल, शाळा, वॉटर टँक, गटर अश्या अनेक सुविधा मिळवून देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे लढाऊ डॅशिंग नेते महेंद्र घरत यांना समस्याग्रस्त उलवे नोडच्या समस्या सोडविण्यासाठी मदतीची आर्त साद घातली. गोरगरीब प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडविण्यामध्ये माहीर असलेल्या कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सिडको स्तरावर एम.डी.,जॉईंट एम.डी.यांच्या बरोबर उलवे नोड नागरिकांच्या मिटींग घेऊन तातडीने हालचाल करून उलवे नोड मधील समस्या सोडविण्यासाठी तातडीने सुरवात केली.  सर्वप्रथम उलवे नोडमधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून घेतले, पाणीपुरवठा अतिशय कामिदाबाने उलवे नोडमध्ये होत होता, सिडको, MIDC, नवी मुंबई, पनवेल कॉर्पोरेशन च्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या स्तराच्या मिटिंग लावून उलवे नोडमधील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करून घेतला.गेल्या ५ वर्षांच्या खडतर पाठपुराव्याने १.५ करोड निधी मंजूर करून उलवे नोडसाठी हक्काची स्मशानभूमी सेक्टर १४ मध्ये बांधन्यास घेतली व उलवे नोड वासीयांची मृत्यू नंतर होत असलेली सशेहोलपट थांबवली. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे उलवे नोडमधील सर्व समस्या निराकरणासाठी महेंद्र घरत कटिबद्ध आहेत असे दाखवून दिले. उलवे नोडमधील शाळा, कॉलेज, गार्डन, मंदिर, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महिला मंडलांसाठी तसेच सामाजिक सुविधांचे प्लॉट चे टेंडर काढण्यास भाग पाडले. २००४ साली आगरी कोळी, नेरूळ भवन च्या निर्मिती नंतर सतत पाठपुरावा करून उलवे नोडमध्ये भुमीपुत्र भवन साठी तत्कालीन एम. डी. श्री.सत्रे, चेअरमन नकुल पाटील, डायरेक्टर नामदेव भगत यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून, भुमीपुत्र भवनचे टेंडर काढेपर्यंत पाठपुरावा केला. आज भुमीपुत्र भवन उलवे नोड मध्ये दिमाखात उभे आहे. लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांनंतर प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे नेते हे महेंद्र घरत आहेत.उलवे वासियांनी याबद्दल कामगार नेते महेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "उलवे नोड वासियांना मिळणार १७ वर्षानंतर हक्काची स्मशानभूमी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याला यश.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...