मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गावठी भाज्या खा, आरोग्य जपा आणि स्थानिक शेतकऱ्यांना मदत करा - अझहर धनसे यांचे आवाहन..

गावठी भाज्या खा, आरोग्य जपा आणि स्थानिक शेतकऱ्यांना मदत करा - अझहर धनसे यांचे आवाहन..


श्रीवर्धन,: पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या काळात गावठी भाज्यांचे सेवन करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष श्री. अझहर धनसे यांनी केले आहे. गावठी भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून, त्यांचे सेवन केल्याने आरोग्य स्थिर राहण्यास मदत होते, असे धनसे यांनी म्हटले आहे.

धनसे यांनी या आवाहनासोबतच एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला आहे. ते म्हणाले की, "गावठी भाज्यांचे सेवन केल्याने केवळ आपले आरोग्यच चांगले राहील असे नाही, तर आपल्या परिसरातील स्थानिक भाजीपाला उत्पादन करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना आर्थिक मदतही मिळेल." पावसाळ्यात अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या स्थानिक भाजीपाला विक्रीवर अवलंबून असतो. त्यामुळे नागरिकांनी गावठी भाज्या खरेदी करून त्यांना अप्रत्यक्षपणे आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन धनसे यांनी केले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ताज्या आणि रसायनमुक्त भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. तसेच, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

या आवाहनामुळे नागरिकांनी स्थानिक बाजारपेठांमधून गावठी भाज्यांची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Response to "गावठी भाज्या खा, आरोग्य जपा आणि स्थानिक शेतकऱ्यांना मदत करा - अझहर धनसे यांचे आवाहन.."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...