
बहुमताने निवडून येण्यासाठी उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतच्या निवडणूका महाविकास आघाडी एकीत्रितपणे लढविणार.
गुरुवार, १ डिसेंबर, २०२२
Comment
उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे ) उरणमध्ये 18 डिसेंबर 2022 रोजी 18 ग्रामपंचायतच्या निवडणूका होणार असून या 18 ग्रामपंचायतच्या निवडणूका मध्ये निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे चार पक्ष एकत्र आले आहेत. या चारही पक्षांनी एकत्र येत उरण तालुक्यातील ग्रामपंचात निवडणूका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सर्व सुत्रे हलविली जात आहेत. या चारही पक्षाने महाविकास आघाडी स्थापन करून त्या द्वारे निवडणूक लढविली जात आहे. उरण तालुक्यात यापूर्वीही विविध निवडणूकीत याच महाविकास आघाडीने निवडणूका लढविल्या आहेत यात महाविकास आघाडीला बरेचशे यश मिळाले आहे. त्यामूळे या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार आहे. प्रत्येक गावागावात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस (आय), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या बळावर व त्यांच्या जनसंपर्कच्या बळावर निवडणूकामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील , काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक आदी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते ग्रामपंचायत निवडणूकीतील बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत.
0 Response to "बहुमताने निवडून येण्यासाठी उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतच्या निवडणूका महाविकास आघाडी एकीत्रितपणे लढविणार."
टिप्पणी पोस्ट करा