मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बाळासाहेबांची शिवसेना पक्ष समर्थ परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून लढणार.

उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बाळासाहेबांची शिवसेना पक्ष समर्थ परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून लढणार.


उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतच्या निवडणूका 18 डिसेंबर 2022 रोजी होणार असून त्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली असून उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतच्या निवडणूकीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे समर्थ परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येणार असून पॅनेल तर्फे सर्व ग्रामपंचायतच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे रायगड उप जिल्हा प्रमुख अतुल परशुराम भगत यांनी  दिली आहे.

 18 डिसेंबर 2022 रोजी उरण तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये समर्थ परिवर्तन पॅनेलचे जास्तीत जास्त सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडून येतील असा आत्मविश्वास अतुल भगत यांनी बोलून दाखविला आहे. त्यामुळे आता समर्थ परिवर्तन पॅनेल तर्फे उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायती स्व बळावर लढविल्या जाणार आहेत. हे आता स्पष्ट झाले आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बाळासाहेबांची शिवसेना पक्ष समर्थ परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून लढणार."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...