मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारतीय मजदूर संघाची (BMS) राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा नवी दिल्ली वेस्टर्न कोर्ट येथे संपन्न.

भारतीय मजदूर संघाची (BMS) राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा नवी दिल्ली वेस्टर्न कोर्ट येथे संपन्न.


उरण - ( विठ्ठल ममताबादे ) :-  भारतीय पोर्ट ॲड डाॅक मजदूर संघाची (BMS)राष्ट्रीय कार्यकारणीची मीटिंग शुक्रवार दिनांक 18 /11/ 2022 रोजी नवी दिल्ली वेस्टर्न कोर्ट शासकीय विश्रामगृहात पार पडली या मीटिंगमध्ये देशातील नऊ बंदरातील कामगार  नेत्यांनी भाग घेतला या राष्ट्रीय मीटिंगमध्ये विविध विषयावरती चर्चा करण्यात आली यामध्ये सर्व देशातील बंदरांमध्ये गुप्त मतदान घेण्यात यावा, खाजगीकरणाविरोधी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन स्थानिक पातळीवर  त्या त्या पोर्ट मध्ये  करणे असा ठराव करण्यात आला  आंदोलनामध्ये गेट मीटिंग, पत्रक वाटणे ,उपोषणाला बसणे अशा प्रकारे आंदोलन करावेचे अशी चर्चा करण्यात आली नवीन वेतन करार लवकरात लवकर करण्यात यावा अशा प्रकारचा ठराव घेण्यात आला विविध पोर्ट मध्ये नवीन कामगार भरती करण्यात यावी तसेच या सभेमध्ये राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष प्रदीप बिजली, महासंघाचे प्रभारी अण्णा धुमाळ ,

राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, कोषाध्यक्ष सुधीर घरत, केके विजय तसेच पारद्वीप पोर्ट भुवनेश्वर (ओरिसा) येथे श्रीकांत राय, जेएनपीटी येथे रवी पाटील या दोन्ही ठिकाणी भारतीय मजूर संघाचे निवडून आलेले विश्वस्त यांच्या अभिनंदन ठराव घेण्यात आला येणाऱ्या काळामध्ये भारतीय मजदूर संघाची  कार्यवाढ व कार्य विस्तार व्हावा यासाठी सर्व बंदरांमध्ये प्रवास करणे आवश्यक आहे 

अशा प्रकारे अनेक ठराव संमत करण्यात आले आणि विशेष कंत्राटी कामगारांना संघटित करून त्यांना न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे असा ठरविण्यात आला आगामी काळात राष्ट्रीय मजदूर   संघाचा सर्व बंदरांमध्ये झेंडा लागेल असा विश्वास भारतीय मधून संघाचे महामंत्री  सुरेश पाटील यांनी व्यक्त केला यामध्ये या सभेमध्ये सभेची प्रस्तावना सुरेश पाटील, सूत्रसंचालन सुधीर घरत, मान्यवरांना मार्गदर्शन अण्णा धुमाळ यांनी केले व कार्यक्रमास रवी शंकरन, सुधीर तीवरेकर,मणीकंठण, विघ्नेश नाईक,मधुशेठ पाटील, जनार्दन बंडा, राजेंद्र घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तर सभेचे आभार प्रदीप बिजली यांनी मानले अशा प्रकारे सभा संपन्न झाली.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "भारतीय मजदूर संघाची (BMS) राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा नवी दिल्ली वेस्टर्न कोर्ट येथे संपन्न."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...