मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.


उरण - प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे )
रक्तदान सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणून समजले जाते.समाजात रक्ताचा तूटवडा लक्षात घेता रक्ताच्या अभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होउ नये. तसेच गोर गरिब गरजू व्यक्तीला वेळेत रक्त उपलब्ध या दृष्टीकोनातून उरण तालुक्यातील वशेणी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी येत एकत्र श्री हनुमान मंदिर वशेणी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबीराला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. वशेणी गावातील तरुण सामाजिक कार्यकर्ते विक्षेप पाटील, सनी म्हात्रे,बंधन म्हात्रे, परिक्षित शिंदे, निखिल म्हात्रे,निशांत ठाकूर , सुशांत म्हात्रे, प्रितेश गोंधळी, सुरज म्हात्रे, मनिष ठाकूर, आकाश पाटील,अल्पेश म्हात्रे , शुभम पाटील, निखिल ठाकर, सुबोध पाटील आदी तरुण, यंग वयातील  सामाजिक कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. एकूण 30  रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरास जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. दिपक गोसावी यांच्या संपूर्ण टीमने उत्तम नियोजन करून रक्त संकलन केले. या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून विविध सामाजिक कार्यात नवीन पिढीने, तरुण पिढीने हिरीरीने सहभाग घ्यावा. व समाजसेवेला हातभार लावावा असे आवाहन या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...