
म्हसळा तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक सेना सज्ज..!
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी ;- शिक्षकांच्या समस्येला नेहमी वाचा फोडणारी शिक्षक संघटना शिक्षक सेनेचे म्हसळा तालुक्यात आगमन झाले आहे. तालुक्यातील सर्व शिक्षणसेवकांनी शिक्षणसेवक कालावधी पूर्ण होताच एकत्रित येऊन भविष्यात आपल्या समस्यांना न्याय देण्यासाठी स्व- कर्तृत्वावर शिक्षक सेनेची स्थापना म्हसळा तालुक्यात केली. शिक्षक सेना म्हसळा तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. अखिल खैरे सर, सरचिटणीसपदी श्री. चंद्रकांत बैसाने सर, कोषाध्यक्षपदी श्री. विशाल साळकर सर, कार्याध्यक्षपदी श्री. आत्माराम करवते सर, उपाध्यक्षपदी श्री. शक्ती कंडे सर, श्री. सय्यद सलीम सय्यद अली सर, श्री. सावन घोडमारे सर, तालुका संपर्क प्रमुख पदी श्री. कासिम पठाण सर, प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. निलेश पाटील सर यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या स्थापना प्रसंगी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रोशन तांडेल साहेब, जिल्हा सरचिटणीस श्री. हितेंद्र म्हात्रे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष श्री. बालाजी जाधव साहेब, तालुक्यातील शिवसेना पक्षाचे नेते माजी उपसभापती श्री. रवींद्र लाड साहेब, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. सुरेश कुडेकर साहेब, तालुका संघटक श्री. कृष्णा म्हात्रे साहेब, तसेच श्रीवर्धन तालुक्याचे शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री. मोहसीन शेख सर उपस्थित होते. समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षकांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मत श्री. रवींद्र लाड साहेब यांनी कार्यक्रमावेळी व्यक्त केले. तसेच शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांनी शिक्षक सेनेत जास्तीत जास्त संख्येने शामिल होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. रोशन तांडेल सर यांनी केले.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "म्हसळा तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक सेना सज्ज..! "
टिप्पणी पोस्ट करा