मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तालुक्यात शासनाच्या स्वच्छतेच्या योजना शासकीय कार्यालयातच ठरतायत फोल..! म्हसळा तहसील कार्यलय आणि प्राथामिक आरोग्य केंद्र च्या स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य अधिकार्‍यांचे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष !!!

म्हसळा तालुक्यात शासनाच्या स्वच्छतेच्या योजना शासकीय कार्यालयातच ठरतायत फोल..! म्हसळा तहसील कार्यलय आणि प्राथामिक आरोग्य केंद्र च्या स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य अधिकार्‍यांचे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष !!!


म्हसळा प्रतिनिधी :- आजवर शासनाने स्वच्छताविषयी अनेक योजना तयार केल्या मात्र त्या बर्‍याच वेळा फोल ठरत असलेल्या दिसून येतात.त्याची अनेक कारणे सांगितली जातात मात्र या सर्व योजना फक्त नागरिकांसाठी असतात का ? असा प्रश्न म्हसळा वासीयांच्या मनात निर्माण झालेला दिसून येतो.याच कारण की,म्हसळा तालुक्यातील म्हसळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले म्हसळा “तहसील कार्यलय” येथे म्हसळा तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक तालुक्याच्या खेडेगावातून शासकीय कामानिमित्त येत असतात. मात्र तहसील कार्यालयाजवळ असणार्‍या स्वच्छतागृहात नेहमीच दुर्गंधी असेलेली पाहायला मिळते. याबाबत कार्यालयात लेखी निवेदनाद्वारे तक्रार तसेच विचारणा केली असता स्वच्छतागृहाचे काम तसेच स्वच्छता ही काम नगरपंचयात म्हसळा च्या अखत्यारीत येतात. अशी माहिती तहसील कार्यालय म्हसळा चे मा.तहसिलदार श्री.गोसावी यांनी लेखी कळवले होते, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारे कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा काही महिन्यांपूर्वी म्हसळा तहसील कार्यालयाचे विद्यमान तहसीलदार श्री.समीर घारे यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता सदरच्या स्वच्छतागृहाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते अशी माहिती दिली. मात्र सदरचे स्वच्छता गृहाचे काम मात्र जैसे थे.! असल्याचे दिसून येते.

तर तहसील कार्यालयातील इतर कर्मचार्‍यांकडे याबाबत चौकशी केली असता. आम्ही आमच्या आमच्या स्व खर्चाने स्वच्छता करून घेतो असे संगितले जाते.

मात्र काही दिवसांनी परत तीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. मग खरच प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे का ? आणि जर असेल तर तहसील कार्यालय सारख्या महत्वाच्या शासकीय कार्यालयातून नागरिकांनी स्वच्छता सोडून अस्वच्छतेचा आदर्श घेऊन जायचा का ? तर कोणत्यातरी एखाद्या विभागाच नाव पुढे करून स्वच्छतेचा विषय टाळाटाळ करून वेळ मारून न्यायची हे कितपत योग्य आहे. असा सवाल म्हसळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांनी केला आहे. तर केवळ म्हसल्यातील तहसील कार्यलायतच नाही तर म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुद्धा स्वच्छतागृहाची हीच परिस्थिति असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना संगितले.

जिथे आरोग्याच्या काळजी घेण्याविषयी संगितले जाते अशा कार्यालयांमधील अगदी ५ आकडी पगार घेणारे समाजाचे सेवक म्हणवून घेणारे अधिकारी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने शासनाच्या स्वच्छताविषयी असणारे धोरण तसेच नियम हे केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच असतात का ? असा प्रश्न देखील त्यांनी आमच्या प्रतींनिधींन जवळ  बोलताना प्रशासनाला विचारला.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा तालुक्यात शासनाच्या स्वच्छतेच्या योजना शासकीय कार्यालयातच ठरतायत फोल..! म्हसळा तहसील कार्यलय आणि प्राथामिक आरोग्य केंद्र च्या स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य अधिकार्‍यांचे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष !!!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...