
चला विद्यार्थ्यांनो अभ्यासाचं नियोजन करा..दहावी आणि बारावीच्या परीक्षांना उरले फक्त नव्वद दिवस.!
म्हसळा - श्रीवर्धन प्रतिनिधी :- असिफ खान
दोन पेपर मध्ये मिळणार एक सुट्टी दिनांक 14:- दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. परीक्षा बोर्डाने वेळापत्रक निश्चित केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून दोन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी दिली जाणार आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रवारीपासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहे. परीक्षेनंतर निकाल वेळेत जाहीर करून विद्यार्थ्यांचा पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परीक्षांपूर्वी किंवा परीक्षेनंतर होतील, असेही सांगितले जात आहे.
परीक्षेचे वेळापत्रकही लवकरचणजाहीर होणार आहे.
दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करून परीक्षेला सामोरे जावे. राज्यभरातील जवळपास ३१ लाख विद्यार्थी सहा हजार केंद्रांवर परीक्षा देतील.
-शरद गोसावी, अध्यक्ष, परीक्षा मंडळ, पुणे.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "चला विद्यार्थ्यांनो अभ्यासाचं नियोजन करा..दहावी आणि बारावीच्या परीक्षांना उरले फक्त नव्वद दिवस.! "
टिप्पणी पोस्ट करा