म्हसळ्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी होतोय खेळ.. स्थानिक प्रशासन तथा लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष.!
म्हसळा प्रतिनिधी : म्हसळा तालुक्यातील म्हसळा शहराच्या लागत असणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल & ज्यू.कॉलेज म्हसळा या शाळेत माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालय सुरू असून या ठिकाणी तालुक्यातील खेड्यापाड्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या म्हसळा बायपास आणि राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने, तसेच म्हसळा शहरातून श्रीवर्धन कडे जाणारा रस्ता - म्हसळा बायपास तसेच श्रीवर्धन कडून येणारा रस्ता हे सर्व रस्ते या शाळे शेजारी जोडले गेले असून या ठिकाणी एक चौक निर्माण झाला आहे.मात्र या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याची अगदी दयनीय अवस्था झालेली दिसून येते.
सदरची शाळा म्हसळा तालुक्यातील सगळ्यात मोठी शाळा तसेच मोठे प्रांगण असल्याने अनेक राजकीय नेतेमंडळी,स्थानिक प्रतिनिधी यांचे या शाळेत नेहमीच कार्यक्रम होत असतात.अगदी ११ नोव्हेंबर रोजी देखील मौलाना अबुल कलाम आझाद plयांच्या जयंती निमित्त शाळेत एकता समजिक ट्रस्ट आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म्हसळा शहर यांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षण दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी आम.अनिकेत जी तटकरे उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांना मा.पालकमंत्री अदिती ताई तटकरे तसेच खा. सूनिलजी तटकरे साहेब हे देखील उपस्थित राहतात.मात्र या रस्त्याकडे लोक प्रतिनिधी तसेच स्थानिक प्रतिनिधी सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करीत असलेले दिसून येतात.
सदरच्या रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता म्हासल्याचे स्थानिक राजकीय नेतेमंडळी आणि लोक प्रतिनिधी घोणसे घाटासारखी या शाळेशेजारी ही अपघात होण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.

0 Response to "म्हसळ्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी होतोय खेळ.. स्थानिक प्रशासन तथा लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष.!"
टिप्पणी पोस्ट करा