मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रायगड मध्ये प्रशासन कंत्राटदार.जे.एम.म्हात्रे यांच्या खिशात.!

रायगड मध्ये प्रशासन कंत्राटदार.जे.एम.म्हात्रे यांच्या खिशात.!


म्हसळा प्रतिनिधी : 
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात सुरू असलेल्या अडाणी पोर्ट [दिघी पोर्ट] च्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू असून, यातच दिघीपोर्ट कडे जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग ७५३[फ] या महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले दिसून येते. मात्र या कामाचे विकासक कंत्राटदार.जे.एम.म्हात्रे यांनी हे काम करत असताना काही प्रमाणात चुका केलेल्या दिसून येतात. ज्यामध्ये घोणसे घाट बनवीत असताना तीव्र उतार आणि तीव्र उतारातील वळणे अशा प्रकारे चुका केलेल्या दिसून येतात. आणि याचा सगळ्यात मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसून येतो. ज्यामध्ये अनेक नागरिकांना आपल्या जिवाभावाची माणस गमवावी लागत आसलेले दिसून येते. तर सर्वसामान्य नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागत. आणि या वर उपाय म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रायगड जिल्हा सरचिटणीस तथा म्हसळा चे माजी सभापती श्री.महादेव पाटील यांनी पुढाकार घेऊन रायगड चे विद्यमान खासदार श्री.सुनील जी तटकरे यांच्या कडे लेखी निवेदन सादर केल्यानंतर तातडीने या विषयावर जिल्हाधिकारी यांची बैठक घेण्यात आली.


त्याचबरोबर श्री.सुनील जी तटकरे यांनी घोणसे येथील अपघात ग्रस्त वळणावर भेट देऊन त्या ठिकाणी पर्यायी मार्गाची मागणी केली होती,मात्र आज तागायत या वळणावर खूप अपघात होऊन देखील त्याला पर्यायी मार्ग मिळाला नाहीतसेच म्हसळा शहरालगत असणार्‍या न्यू इंग्लिश स्कूल येथे ही रस्त्याचे काम करीत असताना दिरंगाई होत असलेली दिसून येते. ज्यामुळे शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना आपला जीव अगदी मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. आणि एवढ होऊन देखील या रस्त्याने प्रवास करणारे नेते मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी अगदी मूग गिळून गप्प असलेले दिसून येतात.  

अगदी लोकप्रतिनिधी स्वतः मागणी करून तसेच प्रशासकीय अधिकारी याच रस्त्यावरून प्रवास करीत असताना होणारा त्रास सहन करून  शांत असलेले पाहता जे.एम.म्हात्रे कंपनीचे अधिकारी  हे कुणाला च जुमानत असल्याचे दिसून येते .आणि मग असा प्रश्न निर्माण होतो की, रायगड मधील प्रशासन हे कंत्राटदार जे.एम.म्हात्रे  यांच्या खिशात आहे की काय ? अशी चर्चा म्हसळा शहरासह तालुक्यात असलेली दिसून येते.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "रायगड मध्ये प्रशासन कंत्राटदार.जे.एम.म्हात्रे यांच्या खिशात.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...