मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आवरे येथील जानकीबाई ठाकूर इंग्रजी माध्यम शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न.!

आवरे येथील जानकीबाई ठाकूर इंग्रजी माध्यम शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न.!


उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्रजी माध्यम शाळेत माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त बुधाजी ठाकूर
तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेत उरण तालुक्यातील आवरे, वशेणी, खोपटें पाणदिवे, चिरनेर व वेश्वी आदी इंग्रजी माध्यम शाळांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता. एकूण 29 स्पर्धकांनी या स्पर्धेत  सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये लहान गटात सान्वी सुमित म्हात्रे प्रथम, श्लोक महेश पाटील द्वितीय तर  दिव्यांशू जीवन केणी यांनी तृतीय क्रमांक पटकवला आहे.मधल्या गटात माही विलास कामोठकर प्रथम,जान्वी विश्वास पाटील द्वितीय व श्रेया कुंदन गावंड हिने तिसरा क्रमांक मिळवला आहे. मोठ्या गटात वेदांत रविंद्र गावंड प्रथम, रुद्राज तुकाराम माळी द्वितीय आणि सुहानी सुरेश पाटील ही  विद्यार्थिनी तिसऱ्या  क्रमांकांची मानकरी ठरली आहे.या सर्व विजेत्या स्पर्धाकांना जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वतीने रोख रक्कम, ट्रॉफी आणि सॅटिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धाचे उदघाटन शिक्षक पालक संघाच्या उपा ध्यक्षा  विशाखा गावंड यांच्या हस्ते करण्यात आले.तर या स्पर्धाचे परीक्षक म्हणून साधना पाटील, भावना ठाकूर, अनिल पाटील, सविता गावंड व संजीवनी यांनी केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक पालक संघाच्या सदस्या  कविता म्हात्रे, जागृती म्हात्रे, स्मिता म्हात्रे, सविता म्हात्रे उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन थळी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहेनत घेतली.एकंदरीत मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात सदर कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "आवरे येथील जानकीबाई ठाकूर इंग्रजी माध्यम शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न.! "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...