मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उरण तालुक्यातील गावा गावांत निपूण उत्सव मोठ्या उत्साहात  साजरा.

उरण तालुक्यातील गावा गावांत निपूण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.


उरण प्रतिनिधी :- (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात निपुण भारत अंतर्गत बाल दिनाचे औचित्य साधून  १४ नोव्हेंबर २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ या सप्ताहात निपुण उत्साह साजरा करण्यात आला. हा सप्ताह साजरा करण्यासाठी उरण तालुक्यातील शिक्षण विभाग आणि प्रथम शिक्षण संस्थेची संपूर्ण टीम प्रत्येक गावागावातील  वाड्या वस्त्यांवर जाऊन  १ ते ३ इयत्तेत शिकणाऱ्या मुलांच्या मातांसोबत  भेटी देण्यात आल्या.या भेटीदरम्यान  पाड्यापाड्यानुसार जे मातांचे गट केले होते त्या गटांना भेटी देऊन आत्तापर्यंत ९ आयडिया व्हिडिओ कार्ड च्या  माध्यमातून मुलांचा शारीरिक , भावनिक , बौद्धिक ,सामाजिक, भाषा व गणित विकास कशा प्रकारे  करण्यात आला याविषयी   लीडर माता आणि गटातील माता यांच्यासोबत चर्चा करण्यात आली . उरण तालुक्यातील माता गटांना भेटून आलेल्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि गावोगावी जाऊन या गटांना प्रोत्साहित केले. यासाठी  उरण तालुक्यातील  शिक्षण विभागातील प्रियांका म्हात्रे - गटशिक्षणाधिकारी त्याचबरोबर केंद्रप्रमुख उर्मिला म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे,तुकाराम म्हात्रे, विषय साधनवेक्ती अनिता काटले, ज्योती ठाकूर,  मनीषा पाटिल, नीलम गावंड, वैशाली गावंड तसेच प्रथम शिक्षण  संस्थेच्या टीम लीडर  रणिता  ठाकूर ,मनीषा गावित, भाषा विषय साधनवेक्ती ,शलाखा पिंगळे गणितं विषय साधन व्यक्ती ,  प्रथम प्रतिनिधी प्रेरणा ठाकूर , सुनिता पाटील , सोनाली म्हात्रे, काशीराम निरगुडे, विठ्ठल नांदोकार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून निपुण माता  बनण्यासाठी  गटांना प्रोत्साहन दिले.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "उरण तालुक्यातील गावा गावांत निपूण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...