
पांगळोली येथील अशरफ खान पठाण यांच्या लढ्याला यश...! व्यायामशाळा बांधकाम अखेर अवैधच प्रशासनाचा शिक्कामोर्तब.
म्हसळा प्रतिनिधी : पांगळोली येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सरपंच तथा ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला कांटाळून अनेक प्रशासकीय अधिकारी यांना लेखी तक्रार तसेच पत्रव्यवहार करून देखील केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असल्याने तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याचे चिरंजीव या ग्रामपंचायत पंगलोली चे सरपंच असल्याने प्रशासनाकडून कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून आले असता, पांगळोली येथील जागरूक आणि जेष्ठ नागरिक श्री.अशरफ खान पठाण यांनी स्वतः अगदी वयाच्या ६५ व्या वर्षी हार्टपेशंट असून देखील केवळ गावच्या हितासाठी आणि लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या मनमर्जी कारभार विरोधात अखेर १०ऑक्टोबर २०२२ रोजी गट विकास अधिकारी {पंचायत समिती म्हसळा} यांना केलेल्या पत्रव्यवहारात उल्लेख केलेप्रमाणे अखेर उपोषणाचा मार्ग पत्करून दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी तहसिल कार्यालय येथे पांगलोली ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उपोषणाला सुरुवात केली. आणि दिवसभर ‘भर पावसात आपल्या जिद्दीने आंदोलन केले असता, प्रशासनाला अशरफ खान पठाण यांच्या समोर गुडघे टेकायला भाग पडले. आणि त्याच दिवशी रात्री १०.०० वा. सदर तक्रारींचा आढावा घेऊन लवकरात लवकर सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सदर पत्र आणि तक्रारी यांवर पुढील कार्यवाहि साठी मुख्य कार्यकारी अधि. जि.प.रायगड यांच्याकडे पाठविण्यात येईल.
याच अनुषंगाने दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती म्हसळा यांच्याकडे चौकशी केली असता. सदर चे जुने ग्रामपंचायत कार्यालय मोडून त्या ठिकाणी सुरु असलेले व्यायामशाळा बांधण्याचे काम अवैध असल्याचे गट विकास अधिकारी यांनी अहवालात नमूद केले आहे. तसेच जुने ग्रामपंचायत कार्यालयाचे असेसमेंट घर क्रं ९३ असून क्षेत्रफळ १२, १४ फुट असून सदर बांधकामाचे भांडवली मुल्य ३,९७,९४७ असल्याचे दिसून येते. भूमापन क्रं.१८/१ अ या जागेत गोठण ग्राम पंचायत पांगळोली सरपंच अशा नावाने ७/१२ आहे. हि जागा शासकीय असून ग्रामपंचायतीकडे विहित करण्यात आलेली आहे.तर दिनांक ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात पूर्णपणे मोडकळीस येऊन ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने ती इमारत पाडणे आवश्यक होते.असे दिनांक २७/१०/२०२२ रोजी सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांच्या जबाबात लिहून दिले होते. परंतू इमारत पाडणे बाबत ग्रामपंचायतीने केलेला ठराव दप्तरी आढळून आलेला नाही. व हि इमारत नादुरुस्त झाल्याचे छायाचित्र देखील उपलब्ध झालेले नाहीत. किंवा उपभियंता {बांधकाम}राजिप श्रीवर्धन यांच्याकडील इमारत मोडकळीस आल्याने वापरास अयोग्य या बाबत चा दाखला देखील ग्रामपंचायत दप्तरी आढळून न आल्याने ग्रामपंचायत पांगलोली ची जुनी इमारत नादुरुस्त असलेबाबत सक्षम प्राधिकारी यांचा दाखला व छायाचित्र उपलब्ध नसल्याने सदरची इमारत पाडणे योग्य होती किंवा कसे याबाबत खात्री करता येत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाचे भांडवली मूल्य ३,९७,९४७ रु चे ग्रामपंचायतीचे नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याने सदरचे रक्कम सरपंच श्री.बिलाल कौचाली तसेच ग्रामसेवक श्री.गणपती केसकर यांच्याकडून वसूल करून ग्रामनिधीमध्ये भरणा करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीने
दिनांक.२९/१२/२०२१ रोजी स.११.०० वा.ग्रामपंचायत कमिटीची सभा घेतल्याचे इतिवृत्तावरून दिसून येते.मात्र या इतिवृत्तामधील सभेच्या तारखेमध्ये खाडाखोड असल्याचे आढळून येते.
तर ग्रामपंचायतीला व्यायाम शाळेसाठी मंजूर झालेली झालेली निधी रक्कम ७.०० लक्ष रु.या बांधकामाची निविदा व नोटीस निविदा प्रक्रिया पूर्ण न करता कोणताही ठराव न घेता कार्यारंभ आदेश श्री.विवेक विनोद पाखड यांना देण्यात आलेला आहे.याबाबत ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम ०५६ मधील तरतुदीनुसार अनियमितता आढळून येते. तर या अगोदर देखील अशाच चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत पांगळोली यांच्याकडून श्री.विवेक विनोद पाखड यांना मोठ्या प्रमाणात काम दिली असल्याचे आमच्या सूत्रांकडून समजते.तर या सर्वांच्या विरोधात श्री.अशरफ खान पठाण यांनी पुकारलेल्या लढ्यात यश प्राप्त होताना दिसून येते.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "पांगळोली येथील अशरफ खान पठाण यांच्या लढ्याला यश...! व्यायामशाळा बांधकाम अखेर अवैधच प्रशासनाचा शिक्कामोर्तब. "
टिप्पणी पोस्ट करा