मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा शहरामध्ये अवैध धंद्याना ऊत पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष!

म्हसळा शहरामध्ये अवैध धंद्याना ऊत पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष!


म्हसळा प्रतिनिधी :- म्हसळा शहरामध्ये मटका,जुगार यासारखे अवैध धंदे कायद्याची पायमल्लि करत राजरोस पणे सूर असल्याचे विदारक चित्र सध्या म्हसळा शहरात दिसत आहे.या बाबत सविस्तर व्रुत असे की. म्हसळा शहरातील कुंभारवाडी परिसरा मध्ये रमण म्हाशीलकर ह्यांच्या घराच्या बाजूला एका छोट्या झोपडी वाजा घरामध्ये हे धंदे चालवले जातात. दिनांक. ०७/०५/२०२२ रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे म्हसळा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले होते, निवेदन बाबत सविस्तर व्रुत असे की अवैध मटका जुगाड  चालवणारे श्री.समीर पोळेकर (श्रीवर्धन) यांच्या माध्यमातून म्हसळा मध्ये श्री.गणेश बिरवाडकर व उदय म्हशीलकर अवैध मटका जुगाड चालवत असून यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

तसेच दि.०५/०८/२०२२ आज रोजी श्री. रमण म्हाशिकर यांच्या घराच्या बाजूला, कुंभार आली मध्ये. श्री.समीर पोळेकर (श्रीवर्धन) यांच्या माध्यमातून श्री.गणेश बिरवाडकर व उदय म्हशीलकर हे मटका धंदा चालवतात असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.

मटका,जुगार या सारखे धंदे बिनबोभाट सुरु असून यांच्या वर कायद्याचा जरा हि धाक दिसून येत नाही. नागरिकांच्या म्हणण्या नुसार या अवैध धंद्यावर पोलीस कोणती हि कारवाई करताना का दिसत नाही? कि पोलिसांचे हे या अवैध धंद्याला सहकार्य अभय नाही ना? अशी हि खोचक टीका करताना नागरिक दिसत आहेत.

कोरोना सारख्या भयानक परिस्थितितुन जनता  नुकतेच सावरलेली  असताना त्यांच्या कष्टाची कमाई या अवैध धंदे वाल्यांच्या खिशात जात असल्याची चीड हि काही गरीब नागरिकान्नि प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केली .आता तरी स्थानिक पोलिसांनी यावर कडक कारवाई करावि अशी मागणी जोर धरू लागली आहे.

खरतर या अगोदर ही या व्यवसाया संदर्भात म्हसळा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देखील ही जर का पोलिस कर्मचारी कोणत्याही प्रकारे कारवाई करत नसतील तर या व्यवसायाचे नेमके मालक कोण आहेत हे तक्रारी अर्ज नुसार माहिती असून देखील कारवाई का करत नाही? असा सवाल म्हसळा शहरातील आणि तालुक्यातील जनता विचारताना दिसत आहे.सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चूक दिसली की लगेचच आमचे पोलिस बांधव उपस्थित होतात आणि कायदेशीर कारवाई करतात.मग या व्यवसाया संदर्भात कोणतीही कारवाई अजून का केली जात नाही हा प्रश्न म्हस्ल्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे?

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा शहरामध्ये अवैध धंद्याना ऊत पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...