मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रोहीत गोविलकर मित्रमंडळातर्फे समाजोयपोगी उपक्रम!

रोहीत गोविलकर मित्रमंडळातर्फे समाजोयपोगी उपक्रम!


▪️गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

▪️महाडमधे इंशुरन्स कॅम्पचे आयोजन  

महाड प्रतिनिधी - पराग वडके : दिनांक 2 ऑगस्ट रोजी रयत शिक्षण संस्थेच्या नागाव शाळेतील विद्यार्थ्यांना रोहीत गोविलकर मित्रमंडळ तर्फे वह्या, पुस्तके, दप्तरे इत्यादी शालेय साहित्य वाटत करण्यात आले. सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. तटकरे सर, सौ. प्राची शेट मॅडम, श्री. प्रशांत निकम सर, तसेच अनेक स्थानीक ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य श्री. प्रमोद गांधी, सौ. पुजा गोविलकर, धनंजय पिंपळे, प्रियांक भगत, सुरज महाडीक, प्रणीत गांधी, रोहन पाटोळे, अनुज हरवंदे, रोहन वडके इत्यादींनी विशेष मेहनत घेतली.

तसेच महाड शहरातील नागरीकांसाठी रोहीत गोविलकर मित्रमंडळ व भारतीय डाक घर-महाड शाखा यांच्या संयुक्त विद्दमाने अत्यल्प रकमेत इन्शुरन्स काढण्याचे शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. महाड शहरातील शेकडो नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. शिबीराला मिळालेल्या उत्स्पुर्त प्रतिसादामुळे येत्या रविवारी दि. ७ ऑगस्ट रोजी सदर शिबिराचे पुन्हा एकदा आयोजन करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष रोहीत गोविलकर यांनी सांगीतले.

समाजातील सर्व स्थरांमधील विवीध गरजूंसाठी कार्यरत राहण्याचा प्रयत्न कायमच प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचे यावेळी श्री. गोविलकर यांनी म्हणाले.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "रोहीत गोविलकर मित्रमंडळातर्फे समाजोयपोगी उपक्रम!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...