गोरेगाव ते श्रीवर्धन राज्य मार्गाची दुरावस्था! एस.म.एल इन्फ्रा एल.एल.पी कंपनीकडून होत आहे शासनाची फसवणूक.
गुरुवार, २८ जुलै, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांपासून श्रीवर्धन तालुक्यातील असणाऱ्या हरिहरेश्वर तसेच दिवेआगर,श्रीवर्धन बीच येथे पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असताना या मार्गाची दुरुस्ती करून वाहतूक व्यवस्थित व्हावी. या अनुषंगाने गेल्या एक ते दीड वर्षांपासून राज्यशासनाने या राज्य महामार्गाचे दुरुस्तीचे काम एस.एम.एल.इन्फ्रा. रोहा या कंपनीला जवळ जवळ १०० कोटी ₹ कंत्राट देण्यात आले असून त्यातील ५०%काम झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांनी आमचे सुत्रांजवळ दिली, दरम्यान सदर रस्त्याचे कामाची पाहणी करता,चिरगाव ते देहेन फाटा या दरम्यान रस्त्याखालून पाणी जाण्यासाठी असणाऱ्या मोरीला भेग गेली असून देहेन फाटा ते म्हसळा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटार संरक्षण भिंतीला देखील तडे गेले असून तसेच काही ठिकाणी भिंत ही कोसळली आहे.
या संदर्भात सा.बां.विभाग यांच्याकडे लवकरच सदर कामाच्या बाबत चौकशी करून कामाच्या क्वालिटी संदर्भात कागदोपत्रांची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे चर्चा करून सदर कंपनीच्या निकृष्ठ कामाबाबत तक्रार करणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांनी व्यक्त केले.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "गोरेगाव ते श्रीवर्धन राज्य मार्गाची दुरावस्था! एस.म.एल इन्फ्रा एल.एल.पी कंपनीकडून होत आहे शासनाची फसवणूक."
टिप्पणी पोस्ट करा