श्रीवर्धन पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.!
२४ तासांमध्ये तपास पूर्ण करून आरोपीला शिक्षा. सश्रीवर्धन प्रतिनिधी : दानिश फसफुंकर :- विस्तर वृत्त असे कि,श्रीवर्धन पोलीस हद्दीतील वाळवटी येथे राहणारा बिलाल इस्माईल जीवरक वय३२ याचे विरोधात मा.पोलीस निरीक्षक श्रीवर्धन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन यांचे मार्फत मा.उपविभागीय दंडाधिकारी सो. यांचे न्यायालयात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ)(ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव क्र.०२\२०२२ पाठविला होता.सदर प्रस्तावित इसम बिलाल इस्माईल जीवरक यांला मा.उपविभागीय दंडाधिकारी सो. श्रीवर्धन यांचे न्यायालयात सुनावणी होऊन सदर इसमाला एक वर्षासाठी श्रीवर्धन, म्हसळा,माणगाव,तळा,रोहा,महाड, पोलाद्पूर, मुरुड या तालुक्यांतून १७\०५\२०२२ रोजी हद्दपार केले आहे.सदर हद्दपार आदेशाची प्रत पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर दि;३१\०५\२०२२ रोजी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोसई खिरड सो,पो शी/२३९० आठरे(बिटमार्शल)यांनी हद्दपार इसम बिलाल इस्माईल जीवरक यास CRPC ५६ (१)(अ)(ब) ची नोटीस बजावून त्यास केळशी जि.रत्नागिरी येथे सोडून आले होते.
दि;२०/०७/२०२२ रोजी स.पो.नि. रसेडे सो. यांना गोपनीय बातमीदारामार्फत सदर हद्दपार इसम बिलाल इस्माईल जीवरक हा क्पोनाचीही पूर्वपरवानगी न घेता मा.उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीवर्धन यांचे हद्दपारी आदेश क्रं २/२०२२ दि १७/०५/२०२२ चे उल्लंघन करून विनाधिकार श्रीवर्धन पो,स्टे.हद्दीतील मु.वाळवटी गावी आढळून आल्याने तसेच चौकशी केली असता,कोणत्याही प्रकारे सामाधान कारक उत्तर न मिळाल्याने त्याला ताब्यात घेत. दि;२०\०७\२०२२ रोजी श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे ७;१९ वा.कलम १४२ म.पो.का प्रमाणे गुन्हा दाखल करम्यात आला होता.नमूद गुन्ह्याचा तपास करून गुन्हा निष्पन्न झाल्याने आरोपीस अटक करून आज न्यायालयात हजर केले असता.आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीस ६ महिने साधी कैद शिक्षा सुनावली आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "श्रीवर्धन पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.!"
टिप्पणी पोस्ट करा