मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तालुक्यातील पांगलोळी येथील कमकुवत आणि धोकादायक पूल बंद करून तत्काळ त्याला पर्यायी मार्ग द्यावा ग्रामस्थांची मागणी.!

म्हसळा तालुक्यातील पांगलोळी येथील कमकुवत आणि धोकादायक पूल बंद करून तत्काळ त्याला पर्यायी मार्ग द्यावा ग्रामस्थांची मागणी.!

म्हसळा प्रतिनिधी - अतिफ उभारे : म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत हद्दीत असनाऱ्या खालचा (शमील) मोहल्ला येथील साकव पूल कमकुवत झाले असून सदर पूल ढासळून कधीही मोठा अपघात होऊ शकतो. तरी सदर पुल धोकादायक ठरवून शासनाने लवकरच लवकर वापरासाठि बंद करण्यात यावा अशी मागणी पांगलोली येथील ग्रामस्थानच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांची प्रतिक्रिया.

पांगलोळी येथील धोकादायक पुलासंदर्भात माझ्याकडे आमच्या ग्रामस्थ तसेच तरुणांनी संपर्क साधला असता. त्यांच्या समोरच म्हसळा पं.स म्हसळा चे गट विकास अधिकारी श्री.पोल साहेब यांच्याकडे फोन द्वारे चर्चा केली असता. त्यांनी तातडीने उप-अभियंता श्री.भगत यांना सदर पुलाचा सर्वे करण्याचे आदेश दिले. श्री.भगत यांनी पुलाचा सर्वे करून पुल धोकादायक परिस्थितीत असून मी उद्याच या पुलाच्या कामासंदर्भात इस्टिमेट तयार करून जिल्हा परिषद अलिबाग येथे पुढील कार्यवाही साठी पाठविनार असल्याचे सांगितले.तरी सदर पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करून,ते पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी.

तसेच या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांच्या माध्यमातून या अगोदर देखील पांगलोळी येथील ग्रामपंचायतचे  सरपंच तसेच ग्रामसेवक, सर्व सदस्य यांचे गावातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यासंदर्भात पंचायत समिती म्हसळा तसेच जि.प.रायगड यांच्याकडे तोंडी तसेच पत्रव्यवहाराच्या माध्यमातून तक्रारी करून सुधा शासकीय अधिकारी आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे आमच्यावर अन्याय करत आहेत. तसेच आमच्या ग्रामस्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येते.

गावातील कचऱ्याच प्रश्न असेल किंवा सध्या उद्भवलेल्या आमच्या पांगलोळी येथील खालचा (शमील) मोहल्ला येथे असणार्या साकव पुला संदर्भात दोन महिन्यांपूर्वी कोकण २४ न्यूज या वेब पोर्टल च्या माध्यमातून तसेच काही स्थानिक वृत्तापत्रांच्या माध्यमातून बातमी प्रकाशित झाली होती.

मात्र शासकीय अधिकारी तसेच लोक प्रतिनिधी यांनी सदरच्या बातमीकडे दुर्लक्ष केल्याने आज त्या पुलाची परीस्थित अत्यंत धोकादायक झाली असून सदरचे पूल केव्हा हि ढासळू शकते. या अवस्थेत असल्याने शासनाने लवकरच लवकर हा पूल वापरासाठी बंद करून त्याला पर्यायी मार्ग देण्यात यावा.आशी मागणी पांगलोळी गावतील ग्रामस्थ तसेच तरुण मंडळींनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा तालुक्यातील पांगलोळी येथील कमकुवत आणि धोकादायक पूल बंद करून तत्काळ त्याला पर्यायी मार्ग द्यावा ग्रामस्थांची मागणी.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...