
पी.एन.पी. माध्यमिक विद्यालय भेंडखळ येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न.
रविवार, १५ जानेवारी, २०२३
Comment
उरण (विठ्ठल ममताबादे ) श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ यांच्या माध्यमातून पी.एन.पी. माध्यमिक विद्यालय भेंडखळ येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खारघर येथील यंत्र अभियांत्रिकी विभाग अधिविख्याता प्रियांका गुरव आणि कार्यशाळा विभाग प्रमुख मयूर सर यांनी दहावी नंतर तांत्रिक विभागामध्ये करिअरचा वाटा कसा असतो, या संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खारघर यांच्यामार्फत मिळालेली माहिती विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त होती. सदर शिबिरात पी.एन.पी. माध्यमिक विद्यालय भेंडखळ येथील शिक्षक रुपेश काळेकर, लता पाटील, दहीता म्हात्रे, संचीता म्हात्रे, श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळाचे संकेत ठाकूर, राकेश भोईर तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
0 Response to " पी.एन.पी. माध्यमिक विद्यालय भेंडखळ येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न."
टिप्पणी पोस्ट करा