मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्येच रहस्य उलगडलं, डॉक्टर पतीनेच हे सर्व केलं, कारण, त्याला वाटायचं की…

डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्येच रहस्य उलगडलं, डॉक्टर पतीनेच हे सर्व केलं, कारण, त्याला वाटायचं की…


महाराष्ट्र,नागपूर :
 डॉक्टर अर्चना राहुले या सरकारी मेडीकल कॉलेज आणि रुग्णालयात 'फिजियोथेरेपी' विभागात सहायक प्रोफेसर पदावर कार्यरत होत्या. नागपूर येथील राहत्या घरात त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. आता तपासात या सगळ्यामागे त्यांचा डॉक्टर पतीच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नागपूरमधील डॉ. अर्चना राहुले हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. 50 वर्षीय महिला डॉक्टर त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. महिलेच्या डोक्यावर काही जखमा होत्या. कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केल्याचे या मधून संकेत मिळाले होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे क्षेत्रात लाडीकर लेआउट येथे या महिला राहत होत्या. मृत महिलेच संपूर्ण नाव डॉ. अर्चना अनिल राहुले आहे. सरकारी मेडीकल कॉलेज आणि रुग्णालयात फिजियोथेरेपीविभागात सहायक प्रोफेसर पदावर त्या कार्यरत होत्या.

डॉ. अर्चना नागपूरध्ये एकट्या रहायच्या. त्यांचे पती डॉ. अनिल राहुले रायपुर छत्तीसगड-रायपूर येथे वैद्याकीय महाविद्यालयात डॉक्टर आहेत. मुलगा तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्येमागे त्यांच्या पतीचा हात आहे. चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीची हत्या केली.

नवरा-मुलगा दोघेही दुसऱ्या राज्यात असायचे

या हत्या प्रकरणात डॉ. अनिल राहुले यांना त्यांच्या भावाने रवी राहुलेने मदत केली. घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकला एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो.

पतीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

डॉ. अनिल राहुले यांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसांनी घरी परतल्यानंतर घरातून दुर्गंध येत असल्याची त्यांनी सूचना दिली. घराचा मुख्य दरवाजा सुद्धा उघडा होता. घरात आत जाऊन पाहिलं, तेव्हा पत्नीचा मृतदेह बिछान्यावर पडलेला होता. हे दृश्य पाहून आपण लगेच पोलिसांना कळवलं, असं नवऱ्याने सांगितलं. मृतदेहाला दुर्गंधी येत होती. त्यामुळे तीन दिवस आधीच हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आताच कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं घाईच ठरेल. पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी डॉ. अर्चना यांचे मोबाइल फोन रेकॉर्डही तपासले असं पोलिसांनी सांगितलं.

 

0 Response to "डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्येच रहस्य उलगडलं, डॉक्टर पतीनेच हे सर्व केलं, कारण, त्याला वाटायचं की…"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...