
सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सत्य, म्हणाले…
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर आता नुकतंच महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता अनेक नेते नाराज झाले आहेत. यात भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर आता नुकतंच महायुती सरकारमधील
मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ
विस्तारानंतर आता अनेक नेते नाराज झाले आहेत. यात भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाचा समावेश आहे. आता सुधीर मुनगंटीवार यांच्या
नाराजीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे.
पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ
नेते आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात
घेतले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
0 Response to "सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सत्य, म्हणाले…"
टिप्पणी पोस्ट करा